मुंबईत स्वच्छतेची पंचवार्षिक योजना

By Admin | Updated: October 31, 2014 00:41 IST2014-10-31T00:41:03+5:302014-10-31T00:41:03+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली स्वच्छता अभियानाची हाक गांभीर्याने घेऊन मुंबई महापालिका कामाला लागली आह़े

Clean Five Year Plan in Mumbai | मुंबईत स्वच्छतेची पंचवार्षिक योजना

मुंबईत स्वच्छतेची पंचवार्षिक योजना

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली स्वच्छता अभियानाची हाक गांभीर्याने घेऊन मुंबई महापालिका कामाला लागली आह़े त्यानुसार दरवर्षी नवनवीन सफाई मोहीम जाहीर करण्याऐवजी स्वच्छतेसाठी पंचवार्षिक आराखडाच तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आह़े त्यानुसार बहुचर्चित स्थळांची 24 तास स्वच्छता राखली जाणार आह़े
हरियाणास्थित सच्चा डेरा पंथाच्या अनुयायांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत येऊन सफाई मोहीम घेतली़ मात्र पाच लाख अनुयायांचा भार पालिकेला पेलवला नाही़ अधिका:यांमधील या उलटसुलट चर्चेचा स्थायी समिती सदस्यांनी आज चांगलाच समाचार घेतला़ अधिका:यांच्या उदासीनतेमुळेच मुंबईत स्वच्छता मोहीम फेल जातात, असे टीकास्त्र सदस्यांनी सोडल़े
याबाबत स्पष्टीकरण देताना अतिरिक्त आयुक्त विकास खारगे यांनी, मुंबईत पुढील पाच वर्षाकरिता स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केल़े या मोहिमेचा आराखडा तयार होत असून स्वयंसेवी संस्था, निवासी सोसायटय़ा, व्यापारी संकुल, दुकानदार यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितल़े या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  (प्रतिनिधी)
 
भाजपाची विरोधकांशी जुंपली
अशा स्वच्छता मोहिमा म्हणजे नुसती शोबाजी असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी स्थायी समितीतून लगावला़ काही दिवसांनी तुम्हालाही विरोधी पक्षाच्या बाकावर बसायचे आहे, असा चिमटा आंबेरकर यांनी काढताच  भाजपा सदस्यांचे पित्त खवळल़े यावर प्रत्युत्तर देत भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी विरोधी पक्षनेत्यांना चक्क विदूषक म्हणत हिणवल़े यामुळे स्थायी समितीचे वातावरण चांगलेच तापल़े
 
अशी असणार स्वच्छता मोहीम
च्पंचवार्षिक स्वच्छता मोहिमेचा आराखडा पालिका तयार करीत आह़े 
च्पर्यटनस्थळ व गर्दीच्या ठिकाणांची 24 तास स्वच्छता केली जाणार आह़े 
च्स्वयंसेवी संस्था, निवासी सोसायटय़ांना पत्र पाठवून सहकार्याचे आवाहन केले जाणार आह़े आठवडय़ातून दोन दिवस या संस्थांना दोन तासांचे श्रमदान करण्याचे आवाहन करण्यात येत आह़े
च्जास्तीत जास्त कचराकुंडय़ांची व्यवस्था करणो,  उद्याने, मैदाने, दवाखाने, मंडईंची सफाई ठेवणो़
च्व्यापारी संकुलातील दुकानांच्या आत व बाहेर दोन डबे ठेवण्याची सूचना दुकाने व आस्थापना खात्याकडून केली जाणार आह़े जेणोकरून लोक त्यात कचरा टाकू शकतील़

 

Web Title: Clean Five Year Plan in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.