Join us

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी जमा केले २५ काेटी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 05:43 IST

एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला

ठळक मुद्देयाबाबतचे पत्र मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, तसेच उपसचिव टी. व्ही. करपते यांनाही पाठविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी खारीचा वाटा उचलत राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन (२५ कोटी रुपये) जमा केले असून, तसे पत्र उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना लिहिले आहे.

सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनीही त्यांचे मे महिन्यातील एक दिवसाचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली. याबाबतचे पत्र मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, तसेच उपसचिव टी. व्ही. करपते यांनाही पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई