उल्हासनगरवर रिपाईचा दावा

By Admin | Updated: September 15, 2014 23:13 IST2014-09-15T23:13:50+5:302014-09-15T23:13:50+5:30

महायुतीतील जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने, शहर रिपाईने कार्यकत्र्यानी मोर्चेबांधणी सुरू करून उल्हासनगर मतदारसंघावर दावा केला आहे.

Claim of Reimbursement on Ulhasnagar | उल्हासनगरवर रिपाईचा दावा

उल्हासनगरवर रिपाईचा दावा

सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
  महायुतीतील जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने, शहर रिपाईने कार्यकत्र्यानी मोर्चेबांधणी सुरू करून उल्हासनगर मतदारसंघावर दावा केला आहे.  
उल्हासनगर मतदारसंघातून एकेकाळी रिपाईच्या तिकिटावर पप्पु कालानी निवडुन आले होते.  तर गेल्या निवडणुकीत कालानी यांनी रिपाईची तिकिट नाकारून अपक्ष उभे राहिल्याने, त्यांचा  पराभव झाला आहे.  शहरात निर्णयात्मक रिपाई मतदार असुन पक्षाने महायुतीकडे उल्हासनगर मतदारसंघ मागितला आहे.  पक्षाचे नेते बी. बी. मोरे, शहरजिल्हाध्यक्ष नाना बागुल, माजी शहराध्यक्ष जे के ढोके, नाना पवार आदीनी पक्ष प्रमुख रामदास आठवले यांची भेट घेऊन उल्हासनगर मतदारसंघाची मागणी केली आहे.
रिपाई पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी जागा वाटपाच्या घोळाकडे दुर्लक्ष करून कार्यकत्यार्ंना कामाला लागण्याच्या सुचना दिल्याची माहिती पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे.   शहरजिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी पक्षाच्या कार्यकत्र्याची मोर्चेबांधणी सुरू केली असून कार्यकत्र्याच्या गुप्त बैठका गेल्या दोन दिवसापासून होत आहे.  मतदारसंघातून शहराध्यक्ष नाना बागूल यांना उमेदवारी देण्याची मागणी स्थानिक नेत्यासह प्रदेश उपाध्यक्ष बी बी मोरे यांनी पक्षाकडे केली आहे.  
उल्हासनगर मतदारसंघात  सर्वाधिक 6क् टक्के मतदार सिंधी समाज असलातरी मतदाना साठी बहुंताश  सिंधी समाज उतरत नसल्याचे चित्र शहरात आहे.  सिंधी समाजा पाठोपाठ मराठी मतदार असून उत्तर भारतीयासह पंजाबी व मुस्लिम मतदारी निर्णयात्मक आहे.  मराठी मतदारांपैकी अध्रेअधिक मतदार रिपाईचे असून मतदारसंघातून 4 नगरसेवक पक्षाचे निवडून आले आहे.  तर एक उमेदवार फक्त दोन मतानी पराभूत झाला आहे.  रिपाई मतदार एकजुटला तर रिपाईचा उमेदवार निश्चित निवडुन येणार असल्याचे मत प्रदेश उपाध्यक्ष बी बी मोरे यांनी व्यक्त केले आहे.
उल्हासनगर मतदारसंघातील महायुतीचा वाद अनेकदा चव्हाटयावर आला असून भाजपात दोन गट उघडउघड पडले आहे.  तसेच आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यपध्दतीवर रिपाई, साई व शिवसेनेने नाराजी व्यक्त केल्याने आयलानी धर्मसंकटात सापडले असून मित्रपक्षाची मनधरणी करण्यात आयलानी यांचा सर्वात जास्त वेळ जात असल्याची चर्चाही शहरात रंगत आहे.  आयलानी विरोधात कालानी कुटुब असा सामना यावेळी न रंगता इतर उमेदवारही रंगत आणणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.  

 

Web Title: Claim of Reimbursement on Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.