शहरात राजकीय भूकंपाचे हादरे

By Admin | Updated: December 30, 2014 00:46 IST2014-12-30T00:46:08+5:302014-12-30T00:46:08+5:30

वर्षभरात नवी मुंबईतही सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी उलथापालथ झाली. अडीच दशके एकहाती सत्ता गाजविणाऱ्या गणेश नाईक यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला.

City earthquake hawks in the city | शहरात राजकीय भूकंपाचे हादरे

शहरात राजकीय भूकंपाचे हादरे

वर्षभरात नवी मुंबईतही सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी उलथापालथ झाली. अडीच दशके एकहाती सत्ता गाजविणाऱ्या गणेश नाईक यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला. त्यांना विधानसभेमध्ये तर चिरंजीवांना लोकसभेमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. शहरात अस्तित्वही नसलेल्या भाजपाला मात्र वर्षअखेरीस अच्छे दिन आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नवी मुंबईमध्ये २०१४ हे वर्ष विविध राजकीय घडामोडींनी गाजले. वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली. महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून नवी मुंबईवर लक्ष केंद्रित केले. निवडणुकीमध्ये ठाणे मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार संजीव नाईक यांचा २ लाख ८१ हजार मतांनी पराभव झाला. नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्येही शिवसेनेला तब्बल ४६ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. नाईक साम्राज्याला हा पहिला धक्का बसला. यानंतर विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच नाईक यांनी दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करत माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला व भाजपामध्ये प्रवेश केला. निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांचा पराभव करून सर्वांनाच धक्का दिला. या पराभवामुळे राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्षाचे शहरात अस्तित्वही नव्हते. पालिकेत पक्षाची एक नगरसेविका आहे. परंतु मोदी लाटेमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला बेलापूर मतदार संघात यश मिळाले तर ऐरोलीमध्येही चांगली मते मिळाली. पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते भाजपामध्ये जाण्यास उत्सुक आहेत. भाजपाला वर्षभरात चांगले दिवस आले आहेत. शिवसेनेला लोकसभा निवडणुकीमध्ये यश आले असले तरी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले असून पालिका निवडणुकीमध्ये अस्तित्व टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेससाठीही हे वर्ष निराशादायीच गेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरातील थोडेफार अस्तित्वही या वर्षभरात जवळपास संपुष्टात आले.

नाईकांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमधील पराभवामुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. घड्याळाच्या चिन्हावर महापालिकेच्या निवडणुका लढल्यास पुन्हा पराभव होईल असे सर्वांनाच वाटू लागले असून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गणेश नाईक भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चेने डिसेंबर महिना गाजला. महिनाभर राजकीय वर्तुळात याच विषयाची चर्चा आहे. भाजपा प्रवेशाची अनेक मुहूर्तांची चर्चा होवू लागली आहे. नाईक यांनी या विषयावर अद्याप काहीच भाष्य केलेले नसले तरी नवीन वर्षात ते भाजपात जाणार असे त्यांचे कार्यकर्ते खात्रीने सांगत आहेत.

च्पालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटांचा शिवसेनेत प्रवेश
च्लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या संजीव नाईकांचा धक्कादायक पराभव
च्माजी आमदार मंदा म्हात्रे यांचा राष्ट्रवादीला रामराम
च्ऐन निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वैभव नाईक यांचा भाजपात प्रवेश
च्विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांचा धक्कादायक पराभव

च्खारघर टोलनाक्याच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांचा काँगे्रसला रामराम
च्उरण मतदार संघात शिवसेनेच्या मनोहर भोईर यांच्याकडून शेकापच्या विवेक पाटील यांचा पराभव
च्गणेश नाईक भाजपामध्ये जाण्याची चर्चा
च्शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

नवी मुंबईप्रमाणे पनवेल व उरणमध्येही मोठ्याप्रमाणात राजकीय परिवर्तन झाले. खारघर टोलनाका रद्द करण्यासाठी तत्कालीन काँगे्रसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलनामध्ये आघाडी घेतली. विधानसभा निवडणुकीपूर्वी टोल रद्द करा, अन्यथा आमदारकीचा राजीनामा देईल, असा इशारा पक्षाला दिला.
पक्षाने याची दखल न घेतल्यामुळे ठाकूर यांनी काँगे्रसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केला. ठाकुरांच्या भाजपा प्रवेशामुळे पनवेलमध्येही पक्षाला चांगले दिवस आले आहेत. उरण मतदार संघामध्ये शेकापचे विवेक पाटील यांचा शिवसेनेच्या मनोहर भोईर यांनी धक्कादायकपणे पराभव केला.
निवडणुकीदरम्यान फारसे चर्चेत नसलेले भोईर निकालानंतर जायंट किलर म्हणून ओळखले जाऊ

 

Web Title: City earthquake hawks in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.