उत्सव साजरे करताना नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 02:22 AM2020-08-02T02:22:32+5:302020-08-02T02:22:49+5:30

अंनिस। प्रत्येकाचा आदरही राखायला हवाच

Citizens should avoid corona infection while celebrating | उत्सव साजरे करताना नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळायला हवा

उत्सव साजरे करताना नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळायला हवा

Next

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. केवळ गणेशोत्सव नाही, तर या काळातील उत्सव साजरे करताना प्रत्येकाचा आदर राखला जाईल याची काळजी घ्यावी, असे समितीने म्हटले आहे. उत्सव साजरा करताना संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा जास्त कुटुंबात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी कोरोनाचा विचार करता आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना गणेशभक्तांनी वनस्पती रंगाने रंगविलेल्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. मूर्तीचे विसर्जन घरीच बादलीमध्ये करावे. ते पाणी झाडांना घालावे. असे केल्याने जलप्रदूषण टाळता येईल.

बकरी ईदनिमित्त रक्तदान करावे. महाराष्ट्र अंनिस मुस्लीम सत्यशोधक मंडळ रक्तदानास प्रोत्साहन देत आहे. यावर्षी अनेक जिल्ह्यांत मुस्लीम समाजातील युवांच्या मदतीने रक्तदानाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनामुळे आपण आर्थिक संकटात आहोत. अशा वेळी आपण अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळला पाहिजे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करत सण, उत्सव साजरे करा. निर्माल्य दान करा. विसर्जित मूर्ती दान करा, असे आवाहन समितीने केले आहे. विशेषत: जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती बादलीत विसर्जित करा. शिवाय उत्सव साजरे करताना नियम, शिस्त पाळा. त्यामुळे कोरोनाच्या संकटाला आणखी आळा घालता येईल, असे समितीने म्हटले आहे.

महापालिकेच्या काही सूचना...
च्कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.
च्गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
च्श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
च्कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे / फुले व हार अर्पण करणे इत्यादी बाबींस आळा घालावा.
च्कोरोना विषाणूची गंभीर आपत्ती लक्षात घेता मंडप सजावट / रोषणाई / देखावे करू नयेत.
च्नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाण्याचे टाळावे.
च्शक्यतो लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाऊ नये.
 

Web Title: Citizens should avoid corona infection while celebrating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.