पोलीस, जागरु क नागरिकांचा सत्कार

By Admin | Updated: July 14, 2015 22:53 IST2015-07-14T22:53:50+5:302015-07-14T22:53:50+5:30

रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी विराजमान झालेल्या मो.सुवेझ हक यांनी कर्तव्यात तत्परता दाखवणारे पोलीस व अधिकारी त्याचबरोबर पोलिसांना सहाय्यभूत ठरलेले

Citizens felicitate the police, aware | पोलीस, जागरु क नागरिकांचा सत्कार

पोलीस, जागरु क नागरिकांचा सत्कार

अलिबाग : रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी विराजमान झालेल्या मो.सुवेझ हक यांनी कर्तव्यात तत्परता दाखवणारे पोलीस व अधिकारी त्याचबरोबर पोलिसांना सहाय्यभूत ठरलेले समाजातील जागरूक व धाडसी नागरिक यांचा सत्कार करुन एक आगळा वस्तुपाठ घालून दिला आहे.
पेणजवळच्या कुरमुर्ली गावच्या फाटाच्या पुढे एक महिला पायी जाताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने खेचून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी घाबरुन न जाता मोठ्या-मोठ्याने आरडाओरडा केला. तेव्हा तेथे असलेले कुरमुर्ली गावातील योगेश उत्तेकर आणि रमेश पांडुरंग बामगुडे या दोन तरुणांनी मोटारसायकलवरुन चोरट्यांचा पाठलाग करत पेण-खोपोली रस्त्यावरील टाईम मेंझर कंपनीजवळ चोरट्यांना या दोघांनी पकडून पेण पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोन तरुणांनी प्रसंगावधान राखून जे धाडस दाखवले त्याबद्दल या धाडसी तरुणांचा रायगड जिल्हा गुन्हे सभेत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेज हक यांनी प्रशस्तीपत्रक देवून सत्कार केला.
५ जुलैला रोहा शहरातील हनुमान टेकडी येथे काही मुलांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद होवून सुमारे ५०० ते ६०० लोकांचा जमाव जमला. त्यावेळी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक कदम व त्यांच्या सोबत पोलीस नाईक नारायण तिडके, पोलीस नाईक सचिन कारभारी,पोलीस शिपाई हरेश्वर सुर्वे यांनी तत्काळ त्या ठिकाणी जावून जमावास शांत केले. १० ते १५ मिनिटातच त्यांच्या मदतीला प्रभारी पोलीस अधिकारी संजय धुमाळ हे पोलीस शिपाई नितीन पाटील, पोलीस हवालदार गोविंद कदम, पोलीस नाईक हनुमंत मंडे असे पोलीस कर्मचारी घेवून घटनास्थळी हजर झाले व काही वेळातच रोहा उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे हेही पोहोचले. त्यांनी संयमासह धाडसाने तुटपुंजी पोलीस मदत असताना जमाव थोपवून धरुन या जमावास हिंसक वळण न लागता, संभाव्य अनर्थ टाळला. त्यांच्या या संयमी व धाडसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मो.सुवेज हक यांनी गुन्हे बैठकीत कौतुक करुन बक्षीस (रिवार्ड) जाहीर केले. या सत्कार सोहळ््याच्यावेळी अपर पोलीस अधीक्षक आर.एल.पवार, सहा पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन महेश्वर रेड्डी आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Citizens felicitate the police, aware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.