नागरीकांना भेडसावत आहे स्वच्छता,पाण्याची समस्या
By Admin | Updated: January 18, 2015 23:14 IST2015-01-18T23:14:51+5:302015-01-18T23:14:51+5:30
या प्रभागामध्ये सर्वाधिक मतदार स्थानिक आहेत. या प्रभागात इतर प्रभागाप्रमाणे नागरिकरणाला वेग आला नाही. नागरी समस्याही माफक प्रमाणात आहेत

नागरीकांना भेडसावत आहे स्वच्छता,पाण्याची समस्या
दीपक मोहिते, वसई
या प्रभागामध्ये सर्वाधिक मतदार स्थानिक आहेत. या प्रभागात इतर प्रभागाप्रमाणे नागरिकरणाला वेग आला नाही. नागरी समस्याही माफक प्रमाणात आहेत. ग्रामस्थांच्या स्वत:च्या विहिरी व बोअरींग असल्यामुळे पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. भविष्यात मात्र, या संदर्भात पावले उचलावी लागतील, कारण या प्रभागालगत मोठ्या प्रमाणात नागरीकरण होऊ लागले आहे. त्याचे विपरीत परिणाम या प्रभागावर जाणवणार आहे.
हा प्रभाग रेल्वेलगत असून स्थानिक रहिवासी हे रेती उत्खनन, रिक्षा व्यवसाय व काही प्रमाणात भातशेती अशा क्षेत्रात स्थिा्रावले आहेत. पूर्वी हा प्रभाग तत्कालीन नगर परिषदेमध्ये समाविष्ठ होता. प्रभागात रास्ता व गटारे इ. विकासकामे झाली. या परिसरात मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रभागात आजवर ८ ते १० कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. बहुजन विकास आघाडीचे हरिश्चंद्र पाटील हे प्रभागातून निवडून आले आहेत. या प्रभागावर गेली अनेक वर्षे बविआचे वर्चस्व आहे. प्रभागातील साफ-सफाईचा प्रश्न मार्गी लागणे गरजे आहे. दैनंदिन साफसफाईच्या कामात ठेकेदार ठरवून दिलेल्या संख्येनुसार कामकाज तैनात करून नसल्यामुळे दैनंदिन साफसफाईची कामे प्रभावीरित्या होत नाहीत.