डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: December 26, 2014 23:09 IST2014-12-26T23:09:26+5:302014-12-26T23:09:26+5:30
काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नगरपालिका प्रशासनाने धूर तसेच औषध फवारणी

डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त
जव्हार : काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नगरपालिका प्रशासनाने धूर तसेच औषध फवारणी करुन डासांमुळे उदभवणाऱ्या डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
एस. टी. स्टॅन्डच्या मागे, संभाजीपथ, कुटीर रूग्णालय परिसरांत, जुन्या डॅम आळी परिसरातील सर्वत्र डासांचा प्रादूर्भाव वाढलेला आहे. प्रशासनाकडून नियमित धूर फवारणी केली जात नाही. त्यामुळे साथीच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. एस.टी.स्ॅटन्ड कॉर्नर लगत रस्त्यावरील उघड्या नाल्यामुळे देखील डासांची पैदास वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याची गरज आहे. प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)