दिंडोशीत काँग्रेसच्या पदयात्रेत नागरिकांचा सहभाग

By Admin | Updated: October 8, 2014 02:01 IST2014-10-08T02:01:53+5:302014-10-08T02:01:53+5:30

दिंडोशी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राजहंस सिंह यांच्या पदयात्रेत स्थानिक जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागली आहे

Citizen participation in Dindoshi Congress rally | दिंडोशीत काँग्रेसच्या पदयात्रेत नागरिकांचा सहभाग

दिंडोशीत काँग्रेसच्या पदयात्रेत नागरिकांचा सहभाग

मुंबई : दिंडोशी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राजहंस सिंह यांच्या पदयात्रेत स्थानिक जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागली आहे. या मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांची ही पोचपावती असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
दिंडोशी येथील वॉर्ड क्र. ३९ मधील त्रिवेणी नगर येथून त्यांनी आज पदयात्रेला सुरुवात केली. त्यानंतर संजय गांधी नगर, इंदिरा नगर, अंबापाडा, सलमा कंपाउंड, सोनू कंपाउंड, आंबेडकर नगर, वाघेश्वरी मंदिर, मावळे नगर, पाल नगर, बंजारीपाडा, पिंपरीपाडा, चित्रवाणी बिल्डिंग, रामलीला मैदान, त्रिवेणी नगर पिंजून काढले. संध्याकाळी चित्रवाणी बिल्डिंग येथून सुरू झालेल्या पदयात्रेमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.
आमदार या नात्याने राजहंस सिंह यांनी पाच वर्षांमध्ये जनहिताला प्राधान्य दिले. जलवाहिनी, शौचालय, गटार नाला तसेच अनेक वर्षांपासून रखडलेले लादीकरणाचे कामही या विभागांमध्ये करण्यात आले आहे. आगामी वर्षात आणखी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार असल्याने या मतदारसंघातील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मिळणार असल्याचा वायदा सिंह यांनी पदयात्रेतून केला. (प्रतिनिधी)

Web Title: Citizen participation in Dindoshi Congress rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.