‘सीआयएसएफ’च्या महिला जवानाने हॉस्टेलमध्येच घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:10 IST2021-08-18T04:10:27+5:302021-08-18T04:10:27+5:30

मुंबई : ‘सीआयएसएफ’च्या महिला शिपाई यास्मिन हैदर अली (२७) यांनी हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी ...

A CISF woman strangled herself inside the hostel | ‘सीआयएसएफ’च्या महिला जवानाने हॉस्टेलमध्येच घेतला गळफास

‘सीआयएसएफ’च्या महिला जवानाने हॉस्टेलमध्येच घेतला गळफास

मुंबई : ‘सीआयएसएफ’च्या महिला शिपाई यास्मिन हैदर अली (२७) यांनी हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी ॲन्टॉपहिल पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान सीआयएसएफ बॅचलर हाॅस्टेल सेक्टर क्रमांक ७ मध्ये यास्मिन यांनी पंख्याला गळफास घेत आयुष्य संपविले. घटनेची वर्दी लागताच सहायक पोलीस आयुक्त सायन विभाग अश्विनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यास्मिन यांचा मृतदेह विच्छेदनासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आला आहे.

यास्मिन या उत्तर प्रदेशच्या रहिवासी होत्या. या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आले नसून याबाबत ॲन्टॉपहिल पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: A CISF woman strangled herself inside the hostel