Join us

VIDEO : सीआयएसएफच्या जवानाने हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाचे वाचविले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 19:17 IST

मुंबई विमानतळावर सीआयएसएफ जवानाने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचविल्याची घटना घडली. ही घटना 26 ऑक्टोबरला घडली असून यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 

मुंबई : मुंबईविमानतळावर सीआयएसएफ जवानाने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचविल्याची घटना घडली. ही घटना 26 ऑक्टोबरला घडली असून यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या डोमेस्टिक विमानतळावर सीआयएसएफ जवानांकडून प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी हृदयविकाराचा झटका आल्याने एक प्रवासी तपासणीच्या काऊंटरजवळ खाली कोसळला. त्यानंतर याठिकाणी उपस्थित असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी त्या प्रवाशाकडे धाव घेतली. यावेळी सीआयएसएफचे अधिकारी मोहित कुमार शर्मा यांनी त्या बेशुद्ध प्रवाशाला लगेच कार्डियो पल्‍मोनरी रीससिटेशन (सीपीआर) दिला. त्यामुळे मोहित कुमार शर्मा यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून ही घटना 26 ऑक्टोबरला घडली होती.  

टॅग्स :मुंबईविमानतळ