Join us

प्रश्नपत्रिकेचा गठ्ठाच गायब; बारावीच्या सायकॉलॉजी विषयाची आजची परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 21:30 IST

अशा पद्धतीने परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा हा दुसरा प्रकार आहे.

मुंबई - एका परीक्षा केंद्रावरील प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने दि कौन्सिल फॉर दि इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (सीआयएससीई) २७ मार्चला होणारी बारावीची सायकॉलॉजी विषयाची परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा आता ४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. आदल्या दिवशी अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी गडबडून गेले आहेत.

अशा पद्धतीने परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा हा दुसरा प्रकार आहे. या आधी बारावीची २६ फेब्रुवारीला होणारी रसायनशास्त्र विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. ती नंतर २१ मार्चला घेण्यात आली. त्यावेळीही पेपरफुटीची जोरदार चर्चा होती. त्यानंतर आता सायकॉलॉजी विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एका परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा गायब झाल्याने निदर्शनास आल्याने मंडळाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :12वी परीक्षापरीक्षा