सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिद्री यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:06 IST2020-12-29T04:06:47+5:302020-12-29T04:06:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिद्री (८७) यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. ट्रेंड अ‍ॅनालिस्ट कोमल ...

Cinematographer Ishwar Bidri passes away | सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिद्री यांचे निधन

सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिद्री यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिद्री (८७) यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. ट्रेंड अ‍ॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी सोशल मीडियावरून ईश्वर बिद्री यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. ईश्वर बिद्री यांचे निधन नेमके कशामुळे झाले, याबाबतची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकलेली नाही.

ईश्वर बिद्री यांनी अंदाज अपना अपना, बॉर्डर, अब के बरस, अंदाज, कभी कही, ढाई अक्षर प्रेम के अशा अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. शिवाय अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, आमीर खान, सनी देओल यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. बिद्री यांच्या निधनाचे वृत्त समजात सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांना त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: Cinematographer Ishwar Bidri passes away