प्रकल्पग्रस्त कृती समितीचा १0 जूनला सिडकोवर मोर्चा

By Admin | Updated: June 2, 2014 04:13 IST2014-06-02T04:13:58+5:302014-06-02T04:13:58+5:30

विविध प्रलंबित मागण्यांसाठी एमआयडीसी प्रकल्पग्रस्त कृती समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

The CIDCOWor Front of the Projected Action Committee on June 10 | प्रकल्पग्रस्त कृती समितीचा १0 जूनला सिडकोवर मोर्चा

प्रकल्पग्रस्त कृती समितीचा १0 जूनला सिडकोवर मोर्चा

नवी मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी एमआयडीसी प्रकल्पग्रस्त कृती समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार येत्या १0 जून रोजी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा आखण्यासाठी शनिवारी शिरवणे येथे कृती समितीची बैठक पार पडली. सत्ताधार्‍यांकडून सोमवारी सिडकोवर काढण्यात येणार्‍या मोर्चाची या बैठकीत खिल्ली उडविण्यात आली. विधानसभेत प्रकल्पग्रस्तांची सहानुभूती मिळवण्यासाठी सत्ताधार्‍यांचा हा मोर्चा असल्याची टीका कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी यावेळी केली. कृती समितीच्या माध्यमातून गेली तीन वर्षे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सिडकोविरोधात लढा दिला जात आहे. मात्र त्यामध्ये सत्ताधार्‍यांनी कधीही सहभाग घेतला नाही. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना प्रकल्पग्रस्तांची आठवण झाली का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील, वसंत म्हात्रे, जयराम म्हात्रे, महादेव मढवी, दगडू पाटील, वैभव नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The CIDCOWor Front of the Projected Action Committee on June 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.