सिडको सुरू करणार आपत्ती नियंत्रण कक्ष

By Admin | Updated: May 29, 2015 23:13 IST2015-05-29T23:13:22+5:302015-05-29T23:13:22+5:30

सिडको कार्यक्षेत्रामध्ये पावसाळ्यात आपत्ती घडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी १ जूनपासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

CIDCO will launch Disaster Control Room | सिडको सुरू करणार आपत्ती नियंत्रण कक्ष

सिडको सुरू करणार आपत्ती नियंत्रण कक्ष

नवी मुंबई : सिडको कार्यक्षेत्रामध्ये पावसाळ्यात आपत्ती घडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी १ जूनपासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. २४ तास कक्ष सुरू असणार असून नागरिकांना तत्काळ मदत मिळवून देण्यात येणार आहे.
सीबीडीतील सिडको भवनच्या तळमजल्यावर हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षामध्ये अभियांत्रिकी विभाग, आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा, उद्यान विभागाचे कर्मचारी २४ तास तैनात केले जाणार आहेत. वृृक्षांची पडझड, रस्त्यावरील उघड्या गटारांना झाकणे लावणे, पूरसदृश स्थिती, रस्त्यांची दुरवस्था, रोड व नाल्यात साचलेला कचरा, आग, साथीचे आजार, इमारत कोसळणे, दरड कोसळणे व इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दूरध्वनी क्रमांक व व्हॉट्सअ‍ॅप नंबर देण्यात आला आहे. नागरिकांनी फोनवरून किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून माहिती दिली की ती तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. अग्निशमन केंद्र, हॉस्पिटल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस व इतर संबंधितांना आवश्यकतेनुसार कळविण्यात येणार आहे.
नागरी संरक्षण दल, सामाजिक संस्था, व इतर माहिती दिली जाणार आहे. दगडखाणी व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागेवर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. अपघातप्रवण ठिकाणी सिडकोचे सुरक्षा रक्षक तैनात केले जातील. धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या वेळी पाणी साठल्यास उपसा करणारी यंत्रसामग्री २४ तास उपलब्ध करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

नागरिकांसाठी
संपर्क नंबर
च्सिडको क्षेत्रातील नागरिकांनी कोणतीही आपत्ती ओढवल्यास ६१०५४५४० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ८८७९२२८८९६ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: CIDCO will launch Disaster Control Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.