नवीन पनवेलमध्ये अवतरली सिडको

By Admin | Updated: August 3, 2014 23:44 IST2014-08-03T23:44:47+5:302014-08-03T23:44:47+5:30

परिसरातील नागरीसुविधांचा प्रश्न नगरसेवक संतोष शेट्टी आणि सीताताई पाटील यांनी उपोषण करून चव्हाट्यावर आणला होता.

CIDCO descends into new Panvel | नवीन पनवेलमध्ये अवतरली सिडको

नवीन पनवेलमध्ये अवतरली सिडको

पनवेल : परिसरातील नागरीसुविधांचा प्रश्न नगरसेवक संतोष शेट्टी आणि सीताताई पाटील यांनी उपोषण करून चव्हाट्यावर आणला होता. त्याची दखल घेत रविवारी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्यासह समस्त सिडको अधिकारी नवीन पनवेलमध्ये अवतरले. भाटीया यांनी या ठिकाणच्या नागरी सुविधांचा दर्जा सुधारविण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या त्याचबरोबर याबाबत दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला
नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत पाणी, त्याचबरोबर कचऱ्याच्या प्रश्नाने अतिशय गंभीर स्वरूप धारण केले होते. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही सुधारणा होत नसल्याचे पाहून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका सीताताई पाटील आणि इतर सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मागील आठवडयात ठिय्या आंदोलन केले. त्याचबरोबर आमरण उपोषण करीत प्रशासनाविरोधातील असंतोषाला वाट करून दिली या संदर्भात व्यवस्थापकिय संचालक संजय भाटिया यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानुसार आज भाटिया हे स्वत: सुट्टी असतानाही नवीन पनवेलला आले. त्यांनी नवीन पनवेल, खांदा वसाहत पोदी या भागाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पाहणी केली.
त्यांनी मोकळे भूखंड, सामाजिक कारणासाठी राखीव ठेवलेले भूखंड, उद्याने, खेळाची मैदाने, गृहनिर्माण या संदर्भात प्रत्यक्ष स्थळावर जावून माहिती घेतली. त्याचबरोबर या नोडमध्ये नागरी सुविधांची काय स्थिती याचा आढावा घेतला. पावसाळयात नवीन पनवेलकरांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधीत विभागाला दिल्या. त्याचबरोबर नवीन पनवेलच्या लगतहून जाणाऱ्या गाढी नदी किनारा त्याचबरोबर होल्डींग पॉण्डचे सुशोभिकरण करण्यासाठी त्वरीत विशेष नियोजन करा असे आदेश दिले. विजय पथ मार्गालगत असलेल्या राजीव गांधी मैदानावर फुटबॉल ग्राऊंड, जॉगिंग ट्रॅक करण्याची शेट्टी यांची मागणी मान्य करण्यात आली. याशिवाय बस टर्मिनल्सकडे विशेष लक्ष देणे, फेरीवाले आणि आठवडे बाजाराचे धोरणानुसार अंमलबजावणी करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी मुख्य अभियंता एस.एस चौधरी, के.के वरखेडकर, मुख्य आरोग्य अधिकारी बी.एस बावस्कर, मुख्य नियोजनकार एम.डी लेले, सामाजिक सेवा अधिकारी रिमा दीक्षित यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षा चारूशीला घरत, नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका पाटील उपस्थित होते.

Web Title: CIDCO descends into new Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.