पंचरंगी लढतींमुळे चुरस

By Admin | Updated: September 30, 2014 00:42 IST2014-09-30T00:42:16+5:302014-09-30T00:42:16+5:30

ऐरोली व बेलापूर या दोन मतदारसंघांमध्ये तब्बल 34 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत प्रमुख पाच पक्षांमध्ये असणार आहे.

Churus by five-tier batting | पंचरंगी लढतींमुळे चुरस

पंचरंगी लढतींमुळे चुरस

>नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर या दोन मतदारसंघांमध्ये तब्बल 34 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत प्रमुख पाच पक्षांमध्ये असणार आहे. पंचरंगी लढतीमुळे दोन्ही ठिकाणी चुरस वाढली असून, मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार व कोणाला फटका बसणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. 
नवी मुंबईवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणोश नाईक यांचे एकहाती वर्चस्व आहे. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी पिछाडीवर गेल्यामुळे विरोधकांचे मनोबल वाढले आहे. निवडणुकीपूर्वी दोन्ही ठिकाणी दुरंगी फार तर तिरंगी लढत होईल असे अपेक्षित होते. परंतु सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील समीकरणोही बदलली आहेत. शिवसेना व भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणो निवडणुकीला सामोरे जात आहेत. एकेकाळी बेलापूर मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु मागील पंधरा वर्षात आघाडीमुळे  काँग्रेसच्या पदाधिका:यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढता आली नव्हती. पक्षाचे चिन्ह मिळाल्यामुळे काँग्रेस पदाधिका:यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ताकद आजमावण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तत्काळ विधानसभेची तयारी सुरू करून प्रत्येक प्रभाग पिंजून काढला आहे. राष्ट्रवादीचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेमध्ये ऐरोली मतदार संघात फूट पडली आहे. बेलापूरमध्ये भाजपाच्या तिकिटावर माजी आमदार मंदा म्हात्रे निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांच्या मतांचे विभाजन होणार आहे. मनसेचे उमेदवार रिंगणात असले तरी त्यांची संघटनात्मक बांधणी सक्षम नाही. राज ठाकरेंच्या करिष्म्यावर पक्षाचे यश - अपयश अवलंबून असणार आहे. ऐरोली मतदार संघात 19 उमेदवार असून बेलापूरमध्ये 14 उमेदवार असले तरी प्रमुख पाच राजकीय पक्षांमध्ये लढत होणार आहे. सर्वाच्या मतांमध्ये विभाजन होणार असून मतविभागणीचा फटका कोणाला बसणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. शहरावासींयात सध्या मतविभाजनाच्या चर्चा आहे.
- आठ जणांचे अर्ज बाद/ 4
 
4नवी मुंबईमध्ये प्रथमच सर्वाधिक प्रकल्पग्रस्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने दोन्ही मतदार संघात प्रकल्पग्रस्त कृती समितीचे उमेदवार कडवी टक्कर देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
4नवी मुंबईमध्ये प्रथमच सर्वाधिक प्रकल्पग्रस्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाचे दोन्ही 
मतदार संघातील उमेदवार प्रकल्पग्रस्त आहेत.  
4याशिवाय प्रकल्पग्रस्त कृती समितीनेही बेलापूर  मतदार संघामध्ये उमेदवार उभा केला आहे. बेलापूरमध्ये चार तर ऐरोलीमध्ये तीन  प्रमुख उमेदवार प्रकल्पग्रस्त असल्यामुळे यावेळी प्रकल्पग्रस्तांची मते मोठय़ा प्रमाणात विभागली जाणार आहेत. 
 
बेलापूरमधील प्रमुख उमेदवार
गणोश नाईकराष्ट्रवादी
विजय नाहटाशिवसेना
मंदा म्हात्रेभाजपा
नामदेव भगतकाँग्रेस
डॉ. राजेश पाटीलप्र. कृ.समिती
गजानन काळेमनसे
 
ऐरोलीमधील प्रमुख उमेदवार
संदीप नाईकराष्ट्रवादी
विजय चौगुलेशिवसेना
रमाकांत म्हात्रेकाँग्रेस
वैभव नाईकभाजपा
गजानन खबालेमनसे 

Web Title: Churus by five-tier batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.