माटुंग्यात चिमुरडीवर बलात्कार
By Admin | Updated: December 11, 2014 02:21 IST2014-12-11T02:21:33+5:302014-12-11T02:21:33+5:30
पैसे देण्याचे आमिष दाखवत 7 वर्षीय चिमुरडीवर 19 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना माटुंगा येथे घडली.
माटुंग्यात चिमुरडीवर बलात्कार
>मुंबई : पैसे देण्याचे आमिष दाखवत 7 वर्षीय चिमुरडीवर 19 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना माटुंगा येथे घडली. याबाबत शाहू नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोन वर्षापूर्वीच वडिलांच्या निधनानंतर ही सात वर्षीय चिमुरडी आणि तिचा लहान भाऊ तिच्या आजीसोबत माटुंग्याच्या लेबर कॅम्प येथे राहतात. मंगळवारी सकाळी तिची आजी नेहमीप्रमाणो कामावर गेली होती. या वेळी ही पीडित मुलगी आणि तिचा लहान भाऊ घरात होते. याच दरम्यान शेजारीच राहणारा अब्दुल खुद्दूस मुल्ला (19) या नराधमाने मुलीला 2क् रुपयांची नोट दाखवत त्याच्या घरामध्ये नेले. तेथे त्याने मुलीवर बलात्कार केला. याच दरम्यान मुलगी जोरजोरात रडत असल्याने शेजारी राहणा:या रहिवाशांनी या आरोपीच्या घराकडे धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर रहिवाशांनी तत्काळ शाहू नगर पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. तसेच मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला सायन रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या आजीने केलेल्या तक्रारीवरून शाहू नगर पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. (प्रतिनिधी)