जुहूत व्यापारी कुटुंबाला चोप

By Admin | Updated: July 5, 2017 06:59 IST2017-07-05T06:59:23+5:302017-07-05T06:59:23+5:30

दारात सिगारेट का फेकली याचा जाब विचारणाऱ्या व्यापारी कुटुंबीयांना एका त्रिकूटाने बेदम मारहाण केल्याची घटना जुहूत घडली. या

Chuck out the Juhuhat merchant family | जुहूत व्यापारी कुटुंबाला चोप

जुहूत व्यापारी कुटुंबाला चोप

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दारात सिगारेट का फेकली याचा जाब विचारणाऱ्या व्यापारी कुटुंबीयांना एका त्रिकूटाने बेदम मारहाण केल्याची घटना जुहूत
घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध जुहू पोलिसांनी दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जुहू परिसरात व्यापारी रामकृष्ण दास (३१) कुटुंबीयांसोबत राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दारासमोर सिगारेटचे थोटूक आढळून येत होते. रविवारी रात्री उशिराने त्यांनी पाळत ठेवली. तेव्हा तीन तरुणांनी त्यांच्या दारासमोर ओढलेल्या सिगरेटचे थोटूक टाकले. त्यांनी याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली म्हणून तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
एकाने त्यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. तर त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या पत्नीलाही धक्काबुक्की करत मारहाण केली. दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत दास यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री
अरविंद, कार्तिक, सिद्धिविनायक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Chuck out the Juhuhat merchant family