जुनाट मलनि:सारण वाहिन्या बदलणार
By Admin | Updated: December 31, 2014 22:20 IST2014-12-31T22:20:53+5:302014-12-31T22:20:53+5:30
नवीन पनवेलमधील पीएल-५ आणि ६ परिसरातील जुनाट झालेल्या मलनि:सारण वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर उर्वरित वाहिन्याही बदलण्याचे काम नवीन वर्षात हाती घेण्यात येणार आहे.

जुनाट मलनि:सारण वाहिन्या बदलणार
पनवेल : नवीन पनवेलमधील पीएल-५ आणि ६ परिसरातील जुनाट झालेल्या मलनि:सारण वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर उर्वरित वाहिन्याही बदलण्याचे काम नवीन वर्षात हाती घेण्यात येणार आहे. तसेच सिडकोेही एक मुख्य वाहिनी टाकणार आहे. याकरिता स्थानिक नगरसेवक संदीप पाटील यांनी पाठपुरावा केला आहे.
सिडकोने नवीन पनवेल नोड विकसित करीत असताना त्या ठिकाणी इमारती बांधल्या. ए टाईप, बी टाईप, बीटेन, ई-वन त्याचबरोबर पीएल-५ आणि पीएल-६ या सर्व इमारती आणि घरे सिडकोने बांधलेली आहेत. या घरांव्यतिरिक्त सुरुवातीला या ठिकाणी काहीच नव्हते. ३५ वर्षापूर्वी येथे प्राधिकरणाने येथे रस्ते, गटारे आणि पाणी पुरवठा करण्याकरिता वाहिन्या टाकल्याच, त्याचबरोबर त्यावेळी असलेली लोकसंख्या विचारात घेऊन मलनि:सारण वाहिन्याही टाकल्या. त्यानंतर त्या बदलण्यात आल्या नाही त्या जीर्ण आणि जुनाट झाल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अनेक अडचणी येताहेत. वाहिन्यांना गळती त्याचबरोबर तुंबण्याचे प्रकार सर्रास होताहेत. त्यामुळे परिसरात दलदल, दुर्गंधी व डासांची पैदास होत आहे. त्यामुळे पीएल-५ आणि पीएल-६ मधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यानुसार स्थानिक नगरसेवक संदीप पाटील यांना पाठपुरावा करुन महाराष्ट्र नगरोत्थान अभियातून ३०० मीटर लांबीच्या अंतर्गत मलनि:सारण वाहिन्या बदलून घेतल्या. त्याचबरोबर लवकरच सेक्टर -१७ मधील सुमारे ९०० मीटर वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर सोसायट्यांच्या बाहेरील दीड मीटर लांबीच्या मलनि:सारण वाहिन्या सुध्दा बदलण्याचा प्रस्ताव सिडकोकडे पाटील यांनी ठेवला. त्याला लागलीच मंजुरी देऊन नवीन वर्षात प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
च्पीएल-६ आणि पीएल-५ या टाईपच्या एकूण ४९ इमारती असून ४९२ सदनिका आहेत. त्यामध्ये सुमारे अडीच हजार लोकसंख्या आहे. या ठिकाणी जुनाट झालेल्या मलनि:सारण वाहिन्या नगरोत्थान अभियानातून बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.