Join us  

मुंबईतील या चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा करतात ख्रिसमस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 4:58 PM

मुंबईत आणि मुंबईच्या आसपास बरीच कॅथॉलिक कम्युनिटी आहे आणि त्यांची अनेक चर्चही तेथे आसपास आहेत. या चर्चमध्ये तिथली अनेक लोकं ख्रिसमसला जात असतात.

ठळक मुद्देमुंबईसह भारतात अनेक जुनी चर्च आहेत. त्यातील काही चर्च ही ब्रिटिशांनी बांधलेली आहेत.मुंबईतही अनेक कॅथॉलिक कम्युनिटीही आहेत. ख्रिसमससाठी अनेक कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्याकडून केलं जातं. मुंबईतल्या अनेक चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने आजही ख्रिसमस साजरा केला जातो.

मुंबई : मुंबईसह भारतात अनेक जुनी चर्च आहेत. त्यातील काही चर्च ही ब्रिटिशांनी बांधलेली आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत अनेक कॅथलिक कम्युनिटीही आहेत. ख्रिसमससाठी अनेक कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्याकडून केलं जातं. मुंबईतल्या अनेक चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने आजही ख्रिसमस मास साजरा केला जातो. तुम्ही खास ख्रिसमससाठी मुंबईत येणार असाल किंवा मुंबईतल्या मुंबईत जर असे पारंपारिक पद्धतीने ख्रिसमस साजरा करण्यासाठी चर्च शोधत असाल तर आम्ही काही मुंबईतील प्रसिद्ध चर्चविषयी सांगणार आहोत. जिथं आजही पारंपारिक पद्धतीने ख्रिसमस साजरा केला जातो. 

होली नेम कॅथड्रेल, कुलाबा

या चर्चला वेडहाऊस चर्च असंही म्हणतात. हे चर्च याआधी भुलेश्वरला होतं. त्यानंतर भुलेश्वरचं चर्च पाडून कुलाब्यात बांधण्यात आलं. कुलाब्यातलं चर्च १९०५ साली सुरू झालं. या चर्चमध्ये ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी ३ हजाराहून लोक येत असतात. रात्री ९.३० वाजता कॅरोल गायनाला सुरुवात होते. त्यानंतर १० ते ११.३० पर्यंत मास सुरू होतो. 

सेंट जॉन चर्च, कुलाबा

अफगाण चर्च म्हणून ओळख असलेला हा चर्च ब्रिटिशांनी बांधला आहे. १८३५ ते १८४३ या काळात झालेल्या अफगाण युद्धात अनेक सैनिकांचे त्यांचे प्राण गमावले होते. या सैनिकांच्या मृत्यूप्रतिर्थ हा चर्च बांधण्यात आला होता. म्हणूनच या चर्चला  अफगाण चर्चही म्हणतात. हेरिटेज वास्तू म्हणूनही या चर्चची गणना केली जाते. ख्रिसमसच्या  पूर्वसंध्येला वाईल्ड वॉईस चॉयर यांच्याकडून कॅरोलचं गायन १०.३० च्या दरम्यान सुरू होतं.

आणखी वाचा - एका ट्विटमुळे झाली तिची फजिती, शाळेत यावं लागलं ख्रिसमस ट्री बनून

सेंट थॉमस कॅथड्रेल, फोर्ट

१७१८ साली बांधण्यात आलेल्या चर्चमध्ये आजही पारंपारिक पद्धतीने ख्रिसमसच साजरा केला जातो. या चर्चच्या उत्कृष्ट बांधकामामुळेही हे ओळखलं जातं. पांढऱ्या शुभ्र भल्या मोठ्या दालनात प्रार्थना करण्याची मजा काही औरच आहे. 

ग्लोरिया चर्च, भायखळा

या चर्चचा एक वेगळाच इतिहास आहे. १५७२ साली इंग्लडमध्ये हा चर्च बांधण्यात आला होता. त्यानंतर थेट भायखळ्यात १९१० साली हा चर्च शिफ्ट करण्यात आला. १९१३  साली हे बांधकाम पूर्ण झालं. चर्चचा भलामोठा टॉवर आणि त्याच्या आजूबाजूला आणखी ४ टॉवर इथं बांधण्यात आले आहेत. ख्रिसमससाठी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ११.३० वाजता इथं कॅरोल गायन सुरू होतं. 

सेंट मिशेल चर्च, माहिम

१६ व्या शतकात बांधलेलं हे चर्च भारतातील जुन्या चर्चपैकी एक आहे. १९७३ साली या चर्चचं दुरुस्तीकरण करण्यात आलं. जुनं चर्च असल्यामुळे मुंबईतील अनेक ख्रिस्ती बांधव इथं येत असतात. तसंच, मुंबईला भेट देणारे पर्यटकही इथं ख्रिसमसच्या कॅरोल गायनाला उपस्थित राहतात. ख्रिसमससाठी हे चर्च आकर्षक रोषणाईने उजळून निघतं. त्याचप्रमाणे बाहेरचा परिसरही जत्रेमुळे बहरून निघतो. 

माऊंट  मेरी बॅसिलिका, वांद्रे

मुंबईतलं सगळ्यात मिडनाईट माससाठी माऊंस मेरी बॅसिलिका चर्च प्रसिद्ध आहे. एका हिलवर हे चर्च  असल्याने बॅण्ड स्टण्डचा सुंदर नजाराही इथून दिसतो. तसंच, चर्चची ही इमारत तब्बल १०० वर्षांपूर्वीची आहे.

सेंट अँड्य्रु चर्च, वांद्रे

वांद्ऱ्यातील हे सगळ्यात पहिलं चर्च आहे. १५७५ साली हे चर्च बांधण्यात आलं होतं. सेंट पिटर्स आणि सेंट मॅरीमध्ये गर्दी झाल्यावर मुंबईकर या चर्चकडे मोर्चा वळवतात. ख्रिसमस मास इथं १०.३० नंतर सुरू होतो. 

आणखी वाचा - यंदा न्यू इअर पार्टीसाठी पुण्यातील ही हॉटेल्स नक्की ट्राय करा

सेंट पिटर्स चर्च, वांद्रे

वांद्ऱ्यातलं हे दुसरं प्रसिद्ध चर्च. रोमनस्क्यू स्टाईलमध्ये चर्चची इमारत बांधण्यात आलेली आहे. इथंही १० च्या दरम्यान ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला कॅरोल गायन सुरू होतं. आणि शहरातील  अनेकजण इथं भेट देण्यास येत असतात. 

लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन, बोरीवली

मुंबई उपनगरातील हे सगळ्यात महत्त्वाचं चर्च. मुंबईतील जुनं चर्च म्हणूनही या चर्चकडे पाहिलं जातं. इकडं ख्रिसमस मासही तितकंच प्रसिद्ध आहे. वर्षभरात १२ हजाराहून अधिक लोक इथं भेट देतात. ख्रिसमससाठी ९.३०च्या दरम्यान इथं कॅरोल सुरू होतो तर ख्रिसमस मास १० च्या दरम्यान सुरू होतो. 

आणखी वाचा - यंदाचा नाताळ आणि नववर्ष गोव्यात साजरा करणार असाल तर

टॅग्स :मुंबईभारतख्रिसमस