रसायनीत इंधन बचतीवर गोवऱ्यांचा पर्याय
By Admin | Updated: January 31, 2015 22:21 IST2015-01-31T22:21:16+5:302015-01-31T22:21:16+5:30
रसायनी व आसपासच्या ग्रामीण परिसरात शेण गोळा करून त्याला लांबट,गोलाकार आकाराने थापून, उन्हात सुकवून त्यापासून गोवऱ्या तयार केल्या जातात.

रसायनीत इंधन बचतीवर गोवऱ्यांचा पर्याय
राकेश खराडे ल्ल मोहोपाडा
रसायनी व आसपासच्या ग्रामीण परिसरात शेण गोळा करून त्याला लांबट,गोलाकार आकाराने थापून, उन्हात सुकवून त्यापासून गोवऱ्या तयार केल्या जातात. पावसाळी शेणाचा वापर शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगात आणला जातो तर हिवाळ्यात खेडेगावात शेणापासून गोवऱ्या तयार करून त्यापासून इंधननिर्मीती केली जात असल्याने महागाईत अशीही इंधनबचत होत आहे.
आजच्या महागाईच्या जमान्यात आधीच विद्यूत उपकरणे महागली असताना त्यात गँसही महाग झाल्याने गावपातळीवर गोवऱ्यांना खूपच महत्व आले आहे. यात पैशाची बचत होउन स्वयंपाकालाही चव येत असल्याचे ग्रामस्थ नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेण सुकवून ग्रामस्थ इंधनासाठी त्याचा वापर करताना दिसत आहेत.
महागाईमुळे सर्वांचीच तारांबळ उडत असून तुटपुंज्या पगारात घरखर्च आणि आकस्मात येणारा अन्य खर्च कसा भागवायचा असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. स्वयंपाक करण्यासाठी लागणारे गँस-सिलींडर, विजेवर चालणारी उपकरणे, रॉकेल आदीची दरवाढ सुरूच असल्याने कुटूंब प्रमुखाला गरजा भागविणे कठीण होऊन बसले आहे.
स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या सिलींडरच्या दरातही फरक पडला असून सबसिडीकरिता आधारकार्ड जमा करणा-यांना तर गँस सिलेंडरसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
वाढलेल्या महागाईत सिलींडरचा वापर करून स्वयंपाक बनविणेही कठीण झाले आहे. शिवाय जंगलातील लाकूड कमी प्रमाणात मिळत असल्याने येथील खेड्यापाड्यातील शेतक-यांनी इंधनासाठी गाय-म्हैस पाळून त्यापासून मिळत असलेल्या शेणाच्या गोवऱ्यांचा उपयोग इंधनासाठी सुरू आहे.