चिटफंडातून नवी मुंबईत 3 कोटींची फसवणूक
By Admin | Updated: September 4, 2014 02:17 IST2014-09-04T02:17:22+5:302014-09-04T02:17:22+5:30
जादा कमीशनचे अमिष दाखवून 3 कोटी 16 लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तिघांविरोधात नेरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिटफंडातून नवी मुंबईत 3 कोटींची फसवणूक
नवी मुंबई : नेरूळमध्ये चिटफंड कंपनीने जादा कमीशनचे अमिष दाखवून 3 कोटी 16 लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अल्ताफ अन्सारी, आफताब शेख, जुल्फीकार मोहम्मद बोनार या तिघांविरोधात नेरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रिटीश मॅनेजमेंट कंसल्टंसी या चीटफंड कंपनीने मुंबई व नवी मुंबईमध्ये एक लाख रूपये गुंतविल्यास महिन्याला पाच हजार रूपये कमिशन व 15 महिन्यांत मुद्दल परत मिळण्याचे आमिष दाखवले. यात इरफान अहमद मोहम्मद अली जुवाळे व त्याच्या नातेवाईकाने यात 22 लाख 5क् हजार रूपयांची तर इतर मित्रंनी 2 कोटी 93 लाख असे 3 कोटी 16 लाख गुंतवले. (प्रतिनिधी)