चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 07:13 AM2019-08-12T07:13:41+5:302019-08-12T07:14:33+5:30

शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (चिंतामणी) गणेशमूर्तीचे आगमन रविवारी दिमाखात झाले खरे, मात्र आगमन सोहळ्यासाठी जमलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात मंडळाला अपयश आले.

Chintamani Agman Sohala News | चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी

चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी

googlenewsNext

मुंबई : शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (चिंतामणी) गणेशमूर्तीचे आगमन रविवारी दिमाखात झाले खरे, मात्र आगमन सोहळ्यासाठी जमलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात मंडळाला अपयश आले. परिणामी, या आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी करणारी तरुणाई दिसली. शिवाय, व्यवस्थापन करण्यात मंडळाची यंत्रणा अपयशी ठरल्याने बºयाच ठिकाणी रेटारेटीही झाली. त्याचप्रमाणे, लालबाग परिसरात येथील दुभाजकांवर असणाºया झाडांचेही या दरम्यान मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आले.
रविवारी दुपारी सुरू झालेल्या या आगमन सोहळ्यासाठी सकाळपासून चिंचपोकळी, लालबाग आणि करी रोड परिसरात गणेशभक्तांनी येण्यास सुरुवात केली. जवळपास हजारोंनी जमलेल्या गर्दीत सर्वाधिक तरुणाई दिसून आली, सकाळपासून जागा अडवून बसलेल्या तरुणाईचे समूह होते. शिवाय लालबागच्या पुलावरही वाहने थांबवून बाप्पाची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करण्यात आली होती. गणेश टॉकीजकडून सुरू झालेल्या आगमन सोहळ्यादरम्यान गर्दीच्या व्यवस्थापनाचा कमालीचा अभाव दिसून आला. ठरावीक अंतरावर मंडळाचे स्वयंसेवक नसल्याने गर्दीवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण दिसून आले नाही. केवळ दुभाजकांवर निवडक स्वयंसेवक होते. त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहानग्यांना याचा त्रास सहन करावा लागला.
पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर चिंतामणीच्या आगमनासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक होती. लोकलमध्येही या तरुणांनी हुल्लडबाजी करत आरडाओरडा केल्याचे प्रवाशांनी सांगितले. चिंचपोकळी पूल धोकादायक असल्याने त्या मार्गावर गर्दीला प्रवेश देणार नाही, अशी ग्वाही मंडळाने देऊनही पुलावर गणेशभक्तांनी गर्दी केली. या गर्दीला आवर घालण्यासाठी मंडळाला साहाय्य करण्यास पोलीस धावून आलेले दिसून आले.

मार्गांमध्ये बदल न केल्याने वाहतूककोंडी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आगमन सोहळे पार पडले. मात्र परळ, लालबाग, चिंचपोकळी, करी रोड या मार्गांवरून हे आगमन सोहळे पार पडत असतात याची कल्पना असून वाहतुकीचे मार्ग बदलले नाहीत. परिणामी याचा फटका वाहतुकीला बसला. या वाहतूककोंडीत बराच वेळ रुग्णवाहिकेला ताटकळत थांबावे लागले.

Web Title: Chintamani Agman Sohala News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई