Join us

मुंबईतील चीनच्या वाणिज्य दुतावासात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची १११ वी जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 14:37 IST

१९११ च्या क्रांतीचं ११० वं वर्षही उत्साहात साजरा.

ठळक मुद्दे१९११ च्या क्रांतीचं ११० वं वर्षही उत्साहात साजरा.

सीताराम मेवातीमुंबईतील चीनी वाणिज्य दूतावासाने डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त, डॉ. कोटणीस मेमोरियल समितीसह 10 ऑक्टोबर संयुक्तपणे ऑनलाइन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या ऑनलाइन कार्यक्रमात मुंबईतील चीनचे महावाणिज्यदूत तांग गोचाई, इंडिया चायना फ्रेंडशिप असोसिएशनचे महासचिव व्ही. भास्करन, डेक्कन विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. वसंत शिंदे, सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या अध्यक्षा पल्लवी सापले, भारताचे माजी राजदूत ज्ञानेश्वर मुळे, कोटणीस स्मारक समितीचे संस्थापक राजेंद्र जाधव, प्रा. गणेश चन्ना आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुंबईत चीनचे महावाणिज्यदूत तांग गोचाई यांनी आपल्या टिप्पणीमध्ये दोन ऐतिहासिक योगायोग, दोन समकालीन प्रेरणा आणि एक योग्य निवड यावर प्रकाश टाकला. “आज आपण डॉ.कोटणीस यांची 111 वी जयंती आणि 1911 च्या क्रांतीचं 110 वं वर्ष संयुक्त रुपात साजरं करत आहोत. या प्रस्तावने मुळे चीनच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याची आणि मुक्तीची प्रस्तावना उघड झाली, जी चिनी राष्ट्राच्या महान कायाकल्पातील मैलाचा दगड आहे. जपानी आक्रमणाविरूद्ध प्रतिकार युद्ध हे चीनच्या राष्ट्रीय मुक्तीचा महत्त्वपूर्ण काळ होता. डॉ.कोटणीस यांनी भारतापासून चीनपर्यंत हजारो मैल लांबीचा प्रवास केला व जापान वसाहतीच्या आक्रमणाविरुद्धच्या महायुद्धासाठी त्याने स्वतःला पूर्णरूपेण समर्पित केले," असं तांग म्हणाले."आम्ही या वर्षी चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या शतकीय वर्धापन दिन साजरे करीत आहोत. या बरोबरच 14 व्या पंचवार्षिक योजनेचा प्रारंभ ज्याचे उद्दीष्ट २०३५  सालापर्यंत उद्दीष्टे पूर्ण करण्याचा आमचा हेतू आहे. भारताने सुद्धा आपले व्हिजन 2025 सुरू केले आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

परस्पर विश्वास शिकवलाडॉ.कोटणीस यांची भावना, चीन आणि भारत यांच्यातील हजारो वर्षांच्या मैत्रीपूर्ण देवाण घेवाणाने आम्हाला सखोल समज आणि परस्पर विश्वास शिकवला आहे, हे फार उल्लेखनीय आणि महत्वाचे आहे. द्विपक्षीय संबंध विकसित करण्याचा हा एकमेव योग्य मार्ग आहे. डॉ.कोटनीस आपल्या चीनच्या वास्तव्या दरम्यान  सम-विचारी मित्रांना भेटले आणि त्यांना स्वतःच्या जीवनाचे योग्य ध्येय सापडल्याचे तांग म्हणाले.

भारत आणि चीन या दोन महान सभ्यतांनी ऐतिहासिक आणि व्यापक दृष्टीकोनातून हजारो वर्षांपासून फक्त दोन भाऊ म्हणून संवाद साधला आहे. डॉ.कोटणीस हे अतिशय अल्प आयुष्य जगले, तरीही त्यांचा आत्मा आणि वारसा सदैव जिवंत आहे. चीन आणि भारत याना कोणीही विभाजित करू शकत नाही, खंडित करू शकत नाही किंवा आपल्या राष्ट्रीय कायाकल्पात व्यत्यय आणू शकत नाही हे अगदी खरे असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

कोटणीस यांच्याविषयीडॉ द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म 10 ओक्टोबर 1910 मध्ये सोलापुरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. डॉ. कोटणीस हे दुसर्‍या महायुद्धात वैद्यकीय मदत देण्यासाठी चीनला पाठवलेल्या पाच भारतीय चिकित्सकांपैकी एक होते. त्यांनी चीनच्या जनतेचा शेवट पर्यंत साथ दिला व 1938 च्या चीन-जपानी युद्धात सैनिकांवर उपचार करताना मरण पावले. डॉ. कोटणीस हे आशियाई देशात के दिहुआ या चिनी नावाने ओळखले जात होते. चीन सरकारने त्यांच्या सन्मानार्थ चीनच्या हेबेई प्रांताची राजधानी शिजीयाझुआंगमध्ये त्यांच्या नावावर एक शाळा उभारली आहे.

टॅग्स :भारतचीन