चिनी मातीच्या भांडय़ांचे मंदिर भाविकांसाठी आकर्षण

By Admin | Updated: September 4, 2014 23:27 IST2014-09-04T23:27:51+5:302014-09-04T23:27:51+5:30

उथळसरच्या सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने यंदाही काहीतरी वेगळे करुन भाविकांच्या मनावर आपला चांगला ठसा उमटविण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.

Chinese clay pottery temple attraction for the devotees | चिनी मातीच्या भांडय़ांचे मंदिर भाविकांसाठी आकर्षण

चिनी मातीच्या भांडय़ांचे मंदिर भाविकांसाठी आकर्षण

जितेंद्र कालेकर - ठाणो
उथळसरच्या सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने यंदाही काहीतरी वेगळे करुन भाविकांच्या मनावर आपला चांगला ठसा उमटविण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. पूर्वी स्वयंपाकघरातील मांडणीमध्ये कपबशा व इतर भांडी रचून घरात वेगळया प्रकारे सजावट गृहिणींकडून केली जायची.आता मात्र, नविन पद्धतीच्या किचनमध्ये ट्रॉली सिस्टीममुळे आधीची पद्धत एकदमच कालबाहय झाली. मंडळाने हीच आठवण करुन देत आपल्या सजावटीमधून जुन्या आठवणींना ताज्या करण्याचा प्रय} केला आहे. 
महाराष्ट्र स्पोर्टस क्लबकडे  व्यवस्थापन असलेल्या या मंडळाची 1973 मध्ये स्थापना झाली. या मंडळाला 1985 मध्ये ठाणो महापालिकेने पहिल्याच वर्षी पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाने गौरविले आहे. महाराष्ट्र स्पोर्ट क्लबची स्थापना 196क् मध्ये झाली. गणोशोत्सव साजरा करण्याची कल्पना 1973 मध्ये कार्यकत्र्याकडून आल्यानंतर श्री सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाची स्थापना झाल्यानंतर खेळासाठी एकत्र येणा:या तेंव्हाच्या कार्यकत्र्यांनी या उत्सवाला सुरुवात केल्याच्या जुन्या आठवणींना कार्यकत्र्यानी उजाळा दिला.
मंडळामध्ये साधारण 7क् कार्यकर्ते तर 25 पदाधिकारी आहेत. पावणो दोन लाखांपर्यन्त वर्गणी जमा होते.  मंडळाचेच एक कार्यकर्ते संजय भोईर यांच्या संकल्पनेतून यंदा चिनी मातीच्या भांडयांचे मंदीर साकारले आहे. त्यासाठी 75 हजारांचा खर्च आला आहे. मंडळाचेच आर्टिस्ट आणि त्यांचे सहाय्यक मंडळाचेच कार्यकर्ते असल्यामुळे त्या खर्चाची मात्र बचत झाली आहे.मंडळाच्या सजीवटीमुळे किचनच्या आधुनिक ट्रॉलीमध्ये गेलेल्या भांडयांची गृहिणींना आठवण येत असल्यामुळे आल्यामुळे मंदीर साकारणा:यांचे महिला वर्गाने विशेष कौतुक केले. नंतर या सर्व भांडयांचा अल्प दरात लिलाव होणार असल्यामुळे आतापासूनच अनेक महिलांनी त्या मिळविण्यासाठी भांडयांचे  आरक्षणही केले आहे. पर्यावरणभिमुख देखावा ही मंडळाची गेल्या 25 वर्षापासूनची परंपरा यंदाही कायम आहे. या मंदीर उभारणीसाठी मोठी मेहनत घेतली.
 
मंडपासाठी खड्डा होऊ नये म्हणून रस्ता करतांनाच त्या जागी ठाणो महापालिकेच्या परवानगीने रेडीमेड खड्डे ठेवण्यात ते इतर वेळी मातीने बुजविलेले असतात. पोलिसांच्या हरकतीनंतर जाहिरातींद्वारे मिळणा:या निधीचा फायदा न पहाता कमानीही आता काढण्यात आल्याचे मंडळाचे माजी अध्यक्ष आणि सल्लागार नितीन सोनाळकर यांनी सांगितले. विसर्जन मिरवणूकीलाही गेल्या दहा वर्षापासून गुलाल उधळला जात नाही.
 
सामाजिक भान
मंडळाने रक्तदानाच्या जनजागृतीवरही भर दिल्याने बहुतांश कार्यकत्र्यानी अनेकदा रक्तदान केले आहे. शहीद सैनिकांच्या कुटूंबियांना मदत करण्यापासून अनेक सामाजिक उपक्रम मंडळाने राबविले आहेत. त्यामुळे शिस्तप्रिय आणि आदर्श मंडळ म्हणून या मंडळाचा पोलिसांनीही गौरव केला आहे.

 

Web Title: Chinese clay pottery temple attraction for the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.