चीनने भारताकडून लोकशाही मूल्याचे धडे घ्यावेत

By Admin | Updated: September 19, 2014 03:09 IST2014-09-19T03:09:55+5:302014-09-19T03:09:55+5:30

चीनने भारताकडून लोकशाही मूल्ये आणि विविधतेतील एकतेचे धडे घ्यावेत, असे मत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी गुरुवारी येते व्यक्त केले.

China has taken lessons from democracy in India | चीनने भारताकडून लोकशाही मूल्याचे धडे घ्यावेत

चीनने भारताकडून लोकशाही मूल्याचे धडे घ्यावेत

मुंबई : चीनने भारताकडून लोकशाही मूल्ये आणि विविधतेतील एकतेचे धडे घ्यावेत, असे मत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी गुरुवारी येते व्यक्त केले. मात्र सध्या भारत दौ:यावर असलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांची मात्र दलाई लामा यांनी ‘खुल्या मनाचा’ व ‘व्यवहारी’ नेता असे संबोधून व्यक्तिश: स्तुती केली.
इंडियन र्मचट्स चेंबर आणि त्यांच्या महिला शाखेच्या 1क्क्8व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणो म्हणून बोलताना दलाई लामा म्हणाले की, भारत हा प्रचंड लोकसंख्या असलेला विस्तिर्ण भूप्रदेशाचा देश आहे. या देशाच्या विविध भागांमध्ये नानाविध भाषा बोलल्या जातात. असे असले तरी भारतीयांमध्ये एकात्मतेची भावना आहे. भारतात सशक्त लोकशाही आहे व स्वतंत्र प्रसिद्धिमाध्यमे आहेत. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीयांकडून मूल्यांचे धडे घेण्यासारखे आहे.
 दलाई लामा म्हणाले की, परस्परांवरील विश्वासावर आधारलेले चीन व भारत यांचे संबंध खूप 
महत्त्वाचे आहेत. या दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांमुळे केवळ आशिया खंडाचाच नव्हे, तर संपूर्ण जगाचा फायदा होईल.
चीनच्या नव्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. राष्ट्राध्यक्ष शी हे खुल्या मनाचे आहेत व त्यांची कार्यपद्धती व्यवहार्य आहे, असे म्हणून त्यांनी शी ङिानपिंग यांची स्तुती केली. तिबेट प्रश्नाचा उल्लेख करून दलाई लामा म्हणाले की, तिबेटची समस्या ही भारताचीही समस्या आहे. 195क् पूर्वी (भारताच्या) उत्तर सीमेवर एकही सैनिक तैनात नसायचा व सीमाभागात शांतता होती. कधी ना कधी हा प्रश्न सोडवावाच लागेल, पण बळाचा वापर करून नव्हे, तर समजूतदारीने. हा समजूतदारपणा केवळ चर्चेतूनच येऊ शकतो. (प्रतिनिधी)
 
शी यांच्या भारत भेटीच्या विरोधात निदर्शने करणा:या तिबेटी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याविषयी त्यांचे म्हणणो होते की, तिबेटी लोक कायद्याचे पालन करणारे आहेत. बाकी सर्व भारतावर अवलंबून आहे. 

 

Web Title: China has taken lessons from democracy in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.