Join us  

China Coronavirus: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला होणार विलंब?; इंदू मिलमधील स्मारकाला कोरोनाचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 8:59 AM

Dr Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी लागणारं कांस्य, तांबे आणि इतर साहित्य चीनमधून येणार आहेत

ठळक मुद्देसरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचा बराचसा भाग चीनमधूनही आयात केला होताचीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे०२२ पर्यंत स्मारकाचा प्रकल्प पूर्ण करण्याची सूचना - रामदास आठवले

मुंबई - चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल येथील स्मारकाच्या बांधकामाला बसला आहे. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ४५० फूट उंच पुतळा बांधकामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण यासाठी लागणारं साहित्य चीनवरुन आणण्यास विलंब होणार आहे. 

याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये कंत्राटदार शापूरजी पालनजी यांच्यामार्फत उभारण्यात येणाऱ्या 1100 कोटींच्या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. चीनकडून पुतळ्याचे काही साहित्य पुरविण्यात येणार आहे. मात्र चीनमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यामुळे हे साहित्य आणण्यास उशीर होणार आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, २०२२ पर्यंत स्मारकाचा प्रकल्प पूर्ण करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी लागणारं कांस्य, तांबे आणि इतर साहित्य चीनमधून येणार आहेत, गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचा बराचसा भाग चीनमधूनही आयात केला होता, चीनमध्ये कांस्य व तांबे मुबलक प्रमाणात आढळतात. मात्र हे साहित्य आणण्यास प्रशासन अपयशी ठरलं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम काही महिने रखडू शकतं. 

आम्ही पुतळ्याला लागणाऱ्या साहित्याची यादी दिली आहे. ते साहित्य कुठून आणायचं याबाबत कंत्राटदाराने ठरवावे, बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने डिझाईनमध्ये बदल करावे लागतील असं एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

मात्र प्रकल्पाच्या या टप्प्यावर कोरोना व्हायरसमुळे फारसा परिणाम होणार नाही. आम्ही अद्याप खरेदी आणि बांधकामाच्या टप्प्यात पोहचलो नाही, त्यामुळे हे आव्हानात्मक नसेल असं शापूरजी पालनच्या प्रवक्त्यांनी सांगितले. नवीन डिझाईन्सनुसार पुतळ्याची उंची ४५० फूट करण्यात आली आहे. ज्यात १०० फूट पॅडस्टल देखील आहे. या प्रकल्पाची किंमत मागील दोन वर्षात ७०९ कोटी रुपयांवरून ११०० कोटी रुपयांवर गेली आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन केले होते. यामध्ये पुतळ्याव्यतिरिक्त एक लायब्ररी, रायगडमधील ऐतिहासिक चवदार तलावाची प्रतिकृती आणि पार्किंगचाही समावेश आहे.  

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरनरेंद्र मोदीकोरोनाचीन