अनैतिक संबंधांतून चिमुरडीची हत्या

By Admin | Updated: December 23, 2014 01:30 IST2014-12-23T01:30:03+5:302014-12-23T01:30:03+5:30

सायन उड्डाणपुलाखाली शुक्रवारी आढळलेल्या चिमुरडीच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अजगर शेख (४२) या आरोपीला अटक केली आहे. अ

Chimudari Murder From Immoral Relationships | अनैतिक संबंधांतून चिमुरडीची हत्या

अनैतिक संबंधांतून चिमुरडीची हत्या

मुंबई : सायन उड्डाणपुलाखाली शुक्रवारी आढळलेल्या चिमुरडीच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अजगर शेख (४२) या आरोपीला अटक केली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडचण ठरत असल्याने त्याने या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिला आहे.
अफरीन शेख असे या मृत चिमुरडीचे नाव असून, ती सायनच्या भाऊ दाजी रोडवरील फुटपाथवर आई-वडिलांसोबत राहत होती. १४ डिसेंबरला आईच्या बाजूला झोपली असताना पहाटे ४ च्या सुमारास ती अचानक गायब झाली. परिसरात शोधाशोध घेतल्यानंतर तिच्या आईने सायन पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलीस या चिमुरडीचा शोध घेत असतानाच १८ डिसेंबरला सायनच्या मानव सेवा संघ कार्यालयामागे एका लहान मुलीचा मृतदेह असल्याची माहिती सायन पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, चार दिवसांपूर्वी हरवलेल्याच मुलीचा हा मृतदेह असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तत्काळ तिच्या आईला ओळख पटवण्यासाठी बोलावले. त्यानुसार आपलीच मुलगी असल्याचे तिच्या आईने सांगितले. मुलीच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून तिची हत्या झाल्याचा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली. सायन पोलिसांसोबतच गुन्हे शाखा युनिट ४चे अधिकारीदेखील या हत्येचा समांतर तपास करीत होते. त्यांनी तत्काळ या परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे चित्रण एकत्र केले. त्यानंतर चित्रण तपासले असता, एका चित्रणात एक इसम घटनास्थळाजवळ संशयास्पद हालचाली करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तत्काळ या इसमाचे फोटो तयार करून त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, हा इसम एका कॅटरिंगवाल्याकडे काम करीत असून, सायन रुग्णालयासमोरील आवारात झोपत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार दोन दिवस त्याच्यावर पाळत ठेवून शनिवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Chimudari Murder From Immoral Relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.