‘बॅड न्यूज बॅरेट’ च्या भेटीने बच्चे खूश
By Admin | Updated: September 18, 2014 23:32 IST2014-09-18T23:32:21+5:302014-09-18T23:32:21+5:30
डब्ल्यू.डब्ल्यू.ई. सुपरस्टार ‘बॅड न्यूज बॅरेट्ट’ (वेड बॅरेट्ट) याने गुरुवारी वांद्रे येथे लोकमत बाल विकास मंचच्या सभासद मुलांची भेट घेऊन त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

‘बॅड न्यूज बॅरेट’ च्या भेटीने बच्चे खूश
मुंबई: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. सुपरस्टार ‘बॅड न्यूज बॅरेट्ट’ (वेड बॅरेट्ट) याने गुरुवारी वांद्रे येथे लोकमत बाल विकास मंचच्या सभासद मुलांची भेट घेऊन त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेला वेड बॅरेट्टचा भारताता आणि खास करुन मुंबईत विशेष असा चाहता वर्ग आहे. त्यातही बच्चेकंपनीमध्ये बॅरेट्टची जबरदस्त क्रेझ आहे. नेमकी हीच संधी साधताना वेड बॅरेट्टच्या मुंबई भेटीच्या कार्यक्रमसाठी माध्यम प्रायोजक असलेल्या ‘लोकमत’तर्फे वेड बॅरेटट सोबत लहान मुलांचा खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वेड बॅरेट्टला भेटण्यासाठी खूपच उत्सुक असलेल्या लहानग्यांनी आधी पासूनच तयारी करुन ठेवली होती. तो भेटल्यावर काय बोलायचं, फोटो काढताना कोणती पोझ देऊया अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र दुपारी 3 वाजता प्रत्यक्षात बॅरेट्ट आल्यानंतर मात्र प्रत्येकजण अचंबितच झाला. टीव्हीवर अत्यंत आक्रमक दिसणारा बॅरेट्ट हाच का? असाच प्रश्न सर्वाना पडला होता. सध्या दुखापतीमुळे खेळापासून दूर असणारा बॅरेट्ट डब्ल्यू.डब्ल्यू.ई.चा प्रसार करण्यासाठी आणि आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी मुंबई दौ:यावर आहे.
यावेळी उपस्थित मुलांनी बॅरेट्टची स्टाईल आणि त्याची नक्कल करीत खुद्द बॅरेट्टलाच अचंबित केले. या मुलांच्या भेटीमुळे खुश झालेल्या बॅरेट्टने देखील प्रत्येकासोबत फोटो काढून त्यांना स्वत:च्या छायाचित्र स्वाक्षरी करीत भेट दिली. त्याचप्रमाणो डब्ल्यू.डब्ल्यू.ई.ची विशेष भेटवस्तू देखील मिळाल्याने बच्चेकंपनी खुश झाली.
मी शाळेतून घरी आल्यानंतर नेहमी हा खेळ पाहतो. बॅरेट्टची लढत मी कधीच चुकवत नाही. बॅरेट्टची स्टाईल मला खूप आवडते. त्याच्याशी भेट, त्याच्यासोबत फोटो काढता येईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते असे यावेळी लहानग्या शिवम चव्हाणने सांगितले. शिवाय यावेळी सौरव शुक्ला, रिध्दी शिंदे, एश्वर्या गोंधळेकर, अनुष्का शेलार आणि करण डोंग्रे यांनी देखील वेड बॅरेट्टची भेट घेतली.
तत्पूर्वी बॅरेट्टने सकाळी 1क् वाजता लोअर परेल येथील कमला मील्स येथे ‘स्पेशल ऑलिम्पिक’मधील गतिमंद मुलांसमवेत फुटबॉल सामना खेळून त्यांच्या चेह:यावर हास्य फुलवले. शिवाय बाल विकास मंचच्या मुलांना भेटल्यानंतर बॅरेट्टने अंधेरीतील एका मॉलमध्ये भेट देऊन आपल्या ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या सभासद तरुणाईची भेट घेतली. यावेळी बॅरेट्टने आपल्या खास अंदाजाने एकच धमाल उडवत काही निवडक तरुणांसोबत फोटो काढून त्यांना भेटवस्तू दिल्या. (प्रतिनिधी)