मुले चोरणाऱ्याला अटक
By Admin | Updated: March 7, 2015 01:29 IST2015-03-07T01:29:08+5:302015-03-07T01:29:08+5:30
माटुंगा लेबर कॅम्प परिसरातून दोन चिमुरड्या भावंडांचे अपहरण करून पळणाऱ्या सुनील तिवारी(३०) या तरूणाला सतर्क बीटमार्शल अहिरे यांनी पकडले.

मुले चोरणाऱ्याला अटक
मुंबई : माटुंगा लेबर कॅम्प परिसरातून दोन चिमुरड्या भावंडांचे अपहरण करून पळणाऱ्या सुनील तिवारी(३०) या तरूणाला सतर्क बीटमार्शल अहिरे यांनी पकडले.
लेबरकॅम्पमध्ये राहाणाऱ्या मोहम्मद जावेद शेख यांची घराबाहेर खेळणारी मुले मेहताब(५), अल्ताफ(३) अचानक गायब झाली. जावेद, त्यांचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी मुलांचा त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा एक तरूण दोन मुलांना घेऊन माटुंगा एसब्रीजवरून पळत सुटल्याची माहिती जावेद यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. गस्तीवर असलेल्या बीट मार्शल अहिरे यांना ही माहिती मिळाली. ते माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेर गस्तीवर होते. हा संदेश मिळाला आणि पुढल्याच क्षणी एक तरूण दोन लहान मुलांना घेऊन धावताना त्यांना दिसला. लगोलग त्यांनी या तरूणाला थांबवून चौकशी सुरू केली. त्यात लेबरकॅम्पमधून मुलांचे अपहरण करणारा हाच हे अहिरे यांच्या लक्षात आले. त्यांनी आरोपी तिवारीला पकडून ठेवत अधिकची कुमक मागवून घेतली. त्यानुसार तिवारीला माटुंगा पोलीस ठाण्यात आणून अपहरणाच्या गुन्हयात अटक केली गेली.