काचेच्या इमारतींवर पालिकेचा अंकुश
By Admin | Updated: January 1, 2015 01:35 IST2015-01-01T01:35:28+5:302015-01-01T01:35:28+5:30
बचावकार्य करणाऱ्या जवानांचेच प्राण धोक्यात आल्यानंतर मुंबईत २०१२ पूर्वी उभ्या राहिलेल्या काचेच्या इमारतींसाठी पालिकेने नियमावली तयार केली आहे़

काचेच्या इमारतींवर पालिकेचा अंकुश
कारखेडा (वाशिम) : येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, तसेच अतिक्रमित जागेवर शेती करणार्याच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या वरोली येथील गुराख्याचे कुटुंब निराधार झाले आहे. कुटुंबांना शासनाकडून कसलीही आर्थिक मदत मिळाली नाहीच शिवाय या पीडित कुटुंबाच्या व्यथा आणि समस्या जाणून घेण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधीने भेट दिली नाही. कारखेड्याचे युवा शेतकरी राजू राठोड यांनी सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २८ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती, तसेच अतिक्रमित शेतीत म्हैस घुसल्याने शेतकर्याकडून झालेल्या मारहाणीमुळे वरोली येथील गुराखी पुंडलिक महादेव लाखकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नापिकीमुळे आत्महत्या करणारे शेतकरी राजू राठोड यांच्याकडे केवळ दीड एकर शेती होती. मागील वर्षी अतवृष्टीमुळे, तर यंदा कोरड्या दुष्काळामुळे नापिकी झाल्याने ते मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडले होते. वरोली येथे गुरे चारणारे पुंडलिक महादेव लाखकर कसेबसे करुन मोलमजुरीतून मिळणार्या पैशांवर कुटुंबाची गुजराण करायचे. एक दिवस नित्यनियमानुसार शेत शिवारात म्हशी चारत असताना त्यांची एक म्हैस चुकून अतिक्रमित जागेवरील शेतात घुसली. त्यामुळे अतिक्रमित जागेवर शेती करणार्याने क्रोधाने लाखकर यांना काठीने जबर मारहाण केली. उपचारादरम्यान यवतमाळ येथील रुग्णालयात मृत्यू झाला.
पुंडलिक लाखकर हेसुद्धा त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब निराधार झाले. या घटनांची दखल कोणीच घेतली नाही.