शाळकरी मुलींची छेडछाड

By Admin | Updated: January 24, 2015 00:56 IST2015-01-24T00:56:29+5:302015-01-24T00:56:29+5:30

कांदिवली चारकोप परिसरातील भाबरकेर नगर येथील शाळेतील विद्यार्थिनींसोबत छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत.

Child trafficking | शाळकरी मुलींची छेडछाड

शाळकरी मुलींची छेडछाड

मुंबई : कांदिवली चारकोप परिसरातील भाबरकेर नगर येथील शाळेतील विद्यार्थिनींसोबत छेडछाडीचे प्रकार
वाढत आहेत. तक्रार करूनही चारकोप पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शाळा प्रशासनाने केला आहे.
चारकोप भाबरेकर नगर येथे सरोजादेवी विद्यालय ही हिंदी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थिनींसोबत काही तरु ण मुले शाळा परिसरातच छेडछाड करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा ज्या भागात आहे, त्या सोसायटीत रहदारीचा एकमेव मार्ग आहे. त्या रस्त्यावरच ही तरु ण मुले दबा धरून बसतात. सकाळी १० वाजता मधल्या सुटीच्या वेळी आणि दुपारी शाळा सुटताना साडेबाराच्या वेळी काही टवाळखोर मुले येथे जमतात. शाळेच्या बाहेर मुली आल्यावर अश्लील संवाद करतात. नोव्हेंबर महिन्यात याविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यात आली होती. मात्र चारकोप पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. तक्रार केल्याचे कळताच काही दिवस हा प्रकार थांबला. मात्र पुन्हा थोड्याच कालावधीनंतर त्या टवाळखोर मुलांनी हे प्रकार पुन्हा सुरू
केले. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अभिसार मेहता यांच्याकडे काही विद्यार्थिनींनी तक्रार केली. त्यानंतर शुक्रवारी चारकोप पोलीस ठाण्यात मेहता
यांनी पुन्हा तक्रार केली. एक महिन्याहून अधिक काळ हा प्रकार सुरू असताना चारकोप पोलीस इतके दिवस
बघ्याची भूमिका का बजावत होते,
असा प्रश्न मेहता यांनी उपस्थित केला आहे. शुक्रवारी चारकोप पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध तक्र ार दाखल केली.
शाळेच्या आत विद्यार्थी व विद्यार्थिनींची जबाबदारी शाळेची आहे. मात्र शाळेबाहेर आम्ही विद्यार्थ्यांचे संरक्षण कसे करणार, असा सवाल शाळा प्रशासनाने केला आहे. (प्रतिनिधी)

शाळेबाहेर साध्या वेशातील पोलिसांना तैनात करण्यात येईल. त्या छेडछाड करणाऱ्या तरु णांवर कारवाई करण्यात येईल. याबाबत कोणीही माझ्याकडे तक्र ार घेऊन आले नाही. चारकोपचे वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत आदेश देऊन शाळेला भेट देतील. शाळा परिसराची पाहणी करतील.
- बालसिंग राजपूत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ११

Web Title: Child trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.