Join us  

बाल बाल बचे...सुदैवाने वाचले दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 8:00 PM

सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना 

मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त पदी नवनियुक्ती झालेल्या सुबोध कुमार जयस्वाल यांना भेटण्यासाठी आलेले दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी आज सुदैवाने बचावले आहेत. आज दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्तालयात स्पेशल ब्रँचचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे आणि पूर्व उपनगर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाडीवर जीर्ण झालेले मोठं झाड कोसळलं. मात्र, सुदैवाने गाडीत किंवा गाडीच्या आसपास कोणीही नसल्याने दुखापत झाली नाही. 

शिसवे आणि गौतम हे पोलीस आयुक्तालयात बैठकीत असताना हे झाड कोसळलं. त्यामुळे हे दोन अधिकारी अपघातातून वाचले. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास हे झाड कोसळलं. दोन्ही अधिकाऱ्यांच्या गाडीचे नुकसान झाले. मात्र, इतर कोणतीही हानी झाली नाही. तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी कोसळलेले झाड बाजूला केले. आज पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी मुंबईच्या काही भागात सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत . मुलुंडच्या एमजी रोड परिसरात एक महाकाय झाड रस्त्यावर कोसळून एक टेम्पो आणि एका कारचे नुकसान झाला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी परिसरात फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. तर, मुलुंड गोरेगाव लिंक रोड परिसरात देखील एक झाड कोसळून वाहतूक कोंडी झाली होती.  या घटनेत देखील कुठलीही जीवितहानी झालेली नाही.   

टॅग्स :मुंबईपोलिस