Join us

मित्रांसमोर आई रागावली म्हणून मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:33 IST

इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून मंगळवारी १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केली.

मुंबई : इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून मंगळवारी १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. मित्रांसमोर आई रागावली, म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये उघड झाले असून समतानगर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.कॅथलिक गुंडेचा (१५) असे या मृत मुलाचे नाव आहे. तो ठाकूर व्हिलेजमध्ये आईवडील आणि बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील एका कंपनीत एचआर म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडेचा हा दहावीत शिकत होता. त्याच्या आईने त्याला सोमवारी रात्री दम भरत, आधी दहावी पास कर आणि नंतर काय हवे ते कर, असे सांगितले. त्या वेळी तो मित्रांसोबत आॅनलाइन गेम खेळत होता. आई मित्रांसमोर ओरडली म्हणून त्याला अपमानास्पद वाटले. मंगळवारी त्याने इन्स्टाग्रामवर मित्रांना ‘गुडबाय’चा मेसेज टाकला, तसेच मी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही, असेही लिहिले. त्यानंतर त्याने चौदाव्या मजल्यावरून उडी मारली. त्याचा मृतदेह समतानगर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवत, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :मृत्यू