वडाळ्यात चिमुरडीवर बलात्कार

By Admin | Updated: October 26, 2014 01:48 IST2014-10-26T01:48:25+5:302014-10-26T01:48:25+5:30

फटाके वाजवत असलेल्या 9 वर्षीय मुलीचे अपहरण करुन 20 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी वडाळा टीटी येथील अॅण्टोप हिल परिसरात घडली.

Child rape in Vadtal | वडाळ्यात चिमुरडीवर बलात्कार

वडाळ्यात चिमुरडीवर बलात्कार

मुंबई : मोठ्या भावासोबत दुकानाबाहेर फटाके वाजवत असलेल्या 9 वर्षीय मुलीचे अपहरण करुन 20 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी वडाळा टीटी येथील अॅण्टोप हिल परिसरात घडली. 
या मुलीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी बलात्कार, पॉस्को कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन वडाळा टीटी पोलीस आणि गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला आहे.
संबंधित मुलीच्या वडिलांचे अॅन्टॉप हिल परिसरात दुकान आहे. काल रात्री ही मुलगी व तिचा भाऊ दुकानाबाहेर  9 फटाके वाजवत होते. रात्री अकराच्या सुमारास एक अनोळखी तरुण तेथे आला. त्याने या मुलीला आपल्यासोबत नेले. काही समजण्याच्या आत बहीण गायब झाल्याने घाबरलेला भाऊ धावत-पळत घरी आला. त्याने पालकांना घडलेली प्रकार सांगितला. पालकांनी शेजा:यांच्या मदतीने तात्काळ मुलीचा शोध सुरू केला. तसेच तातडीने पोलीस ठाणोही गाठले. 
दरम्यान, मध्यरात्री एकच्या सुमारास मुलगी परिसरातच सापडली. ती रडत होती. तसेच तिचे कपडे रक्ताने माखलेले आढळले. ती सापडताच पोलीस आणि कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या मुलीला उपचारार्थ सायन रूग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती वडाळा टीटी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरण, बलात्कार, बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमानुसार अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी डॉक्टरांच्या परवानगीने मुलीकडे घटनेची विचारपूस केल्याचे सांगण्यात आले. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अपहरणकर्ता तरुण अनोळखी 
होता. त्याने मुलीच्या तोंडावर 
रूमाल बांधला. तोंड आणि 
गळा दाबून त्याने मुलीवर अत्याचार केले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची
प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वडाळा टीटी पोलीस आरोपीचे रेखाचित्र तयार करण्याच्या प्रय}ात आहेत. तसेच या परिसरातील सीसीटीव्हींचाही अभ्यास पोलिसांनी सुरू केला आहे. तूर्तास पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही. (प्रतिनिधी)

 

Web Title: Child rape in Vadtal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.