धोबीघाट परिसरात चिमुरडीवर बलात्कार
By Admin | Updated: August 9, 2014 02:25 IST2014-08-09T02:25:43+5:302014-08-09T02:25:43+5:30
खाऊचे आमिष दाखवत धोबीघाट परिसरात एका 1क्वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून महावीर मिश्र (21) या आरोपीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

धोबीघाट परिसरात चिमुरडीवर बलात्कार
>मुंबई : खाऊचे आमिष दाखवत धोबीघाट परिसरात एका 1क्वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून महावीर मिश्र (21) या आरोपीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
साईबाबानगरमध्ये ही मुलगी राहते. याच परिसरात आरोपी राहत असून, त्याचे मुलीच्या घरी नेहमीचे येणो होते. बुधवारी रात्री मुलगी घराबाहेर असताना आरोपीने तिला खाऊचे आमिष दाखवत त्याच्या घरी नेले. तेथे आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घरी परतल्यानंतर तिने ही बाब तिच्या आईला सांगितली. त्यानुसार त्यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)