Join us  

कोरोना काळात बालमृत्युदर घटला, केंद्रीय आरोग्य विभागाचा अहवालातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 8:38 AM

राज्यात १३ प्रकारच्या आजार किंवा कारणांमुळे बालमृत्यू होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार २०२० मध्ये सर्वाधिक म्हणजे २४ टक्के बालमृत्यू हे ‘प्री मॅच्युरिटी’ आणि ‘लो बर्थ वेट’मुळे झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सन २०१९ मध्ये हे प्रमाण २३ टक्के इतके होते. 

मुंबई : मुंबईत कोरोना काळात बालमृत्युदरांत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मुंबई शहर उपनगरात २०१९-२० साली ४०४ मृत्यूंची नोंद झाली होती, तर २०२०-२१ या काळात २०८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना काळात या मृत्युदरांत घट झाल्याचे दिसून आले आहे.राज्यात १३ प्रकारच्या आजार किंवा कारणांमुळे बालमृत्यू होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार २०२० मध्ये सर्वाधिक म्हणजे २४ टक्के बालमृत्यू हे ‘प्री मॅच्युरिटी’ आणि ‘लो बर्थ वेट’मुळे झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सन २०१९ मध्ये हे प्रमाण २३ टक्के इतके होते. यापूर्वी, अहवालातील माहितीनुसार मुंबईत २०१८-१९ या वर्षात तब्बल १४०२ नवजात बालकांचा मृत्यूंची नोंद झाली होती. स्वच्छतेच्या सुविधा, पोषणमूल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा यांच्या अभावामुळे हे मृ्त्यू ओढवतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बालमृत्यूचे प्रमाण जगभरात देशात सर्वाधिक आहे. 

यापूर्वी, अहवालातील माहितीनुसार मुंबईत २०१८-१९ या वर्षात तब्बल १४०२ नवजात बालकांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. मृत्यूची कारणे - २४ टक्के बालमृत्यू हे ‘प्री मॅच्युरिटी’ आणि ‘लो बर्थ वेट’मुळे होतात. त्यानंतर बर्थ ऍस्पिक्सीया, आरडीएस, कंजिनिटल मालफॉर्मेशन, सेप्सिस, न्यूमोनिया या आजारांमुळे बालमृत्यू होत आहेत. मास्कमुळे आजाराचे प्रमाण घटले.- २०१९ मधील मृत्यूंची नोंद - ४०४ - २०८ २०२० मधील मृत्यूंची नोंद

कोरोना काळात मास्क वापरावर भर कोरोना काळात मास्क वापरावर भर देण्यात आला. त्यामुळे लहान मुलांत प्रदूषण किंवा अन्य संसर्गाचे प्रमाण कमी झाले. तसेच कोरोनामुळे बराच काळ घरातच राहिल्याने लहान मुले अनेक आजारांपासून बचावल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.काय म्हणतात चिल्ड्रन स्पेशालिस्ट -बालकांच्या आरोग्य स्थितीत दरवर्षी सुधारणा होत आहे; परंतु केंद्र व राज्य सरकारांकडून त्यासाठी देण्यात आलेली आर्थिक तरतूद कमी पडते आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक तरतुदीत वाढ व्हावी. - डॉ. अभिजीत मोरे, सदस्य, जनआरोग्य अभियान मास्कमुळे निश्चितच प्रदूषण वा अन्य व्हायरल संसर्गाचे लहानग्यांना होणाऱ्या धोक्याचे प्रमाण कमी झाले. तसेच बराच काळ घरातच राहिल्याने आहारातही समतोल राखला गेला आहे. - डॉ. हेमलता सोनावणे, बाब बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :आरोग्यहॉस्पिटलकोरोना वायरस बातम्याडॉक्टर