वॉशबेसिनचे तुकडे डोक्यात घुसून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:06 IST2021-04-01T04:06:24+5:302021-04-01T04:06:24+5:30

गाेरेगावमध्ये आंघोळ करताना घडला अपघात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आंघोळ करताना न्हाणीघरात घसरल्यानंतर तुटलेल्या वॉशबेसिनचे तुकडे डोक्यात शिरून ...

The child died after pieces of the washbasin penetrated his head | वॉशबेसिनचे तुकडे डोक्यात घुसून मुलाचा मृत्यू

वॉशबेसिनचे तुकडे डोक्यात घुसून मुलाचा मृत्यू

गाेरेगावमध्ये आंघोळ करताना घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आंघोळ करताना न्हाणीघरात घसरल्यानंतर तुटलेल्या वॉशबेसिनचे तुकडे डोक्यात शिरून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. गोरेगावमध्ये हा प्रकार शनिवारी घडला असून, या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

शक्ती तेजबहादूर ठाकूर असे या अपघातात मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील व्यवसायाने वकील आहेत. शक्ती गोरेगावच्या मेघमल्हार इमारतीत कुटुंबासह राहत होता. शनिवारी तो आंघोळ करण्यासाठी न्हाणीघरात गेला असता त्याचा पाय घसरला आणि धक्का लागून वॉशबेसिनही खाली कोसळून त्याचे तुकडे त्याच्या डोक्यात घुसले. यात तो गंभीर जखमी झाला. घरच्यांनी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठविण्यात आला.

पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा केला असून मुलाचे वडील ॲड. तेजबहादूर ठाकूर यांचा जबाबही नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण या प्रकरणी अधिक चाैकशी करीत आहेत.

..............................

Web Title: The child died after pieces of the washbasin penetrated his head