बाल कलाकाराचा विनयभंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 05:12 IST2018-05-16T05:12:35+5:302018-05-16T05:12:35+5:30
छोट्यामोठ्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या एका दहा वर्षांच्या बालिकेचा एका व्यक्तीने विनयभंग केल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली आहे.

बाल कलाकाराचा विनयभंग!
मुंबई : छोट्यामोठ्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या एका दहा वर्षांच्या बालिकेचा एका व्यक्तीने विनयभंग केल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली आहे. सहा महिन्यांपूर्वी ही घटना घडल्याचे त्यांनी म्हटले असून, याबाबत सोमवारी बांगुरनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बालिकेच्या पालकांनी एकाकडून घेतलेली रक्कम परत न देण्यासाठी स्वत:हून हा विनयभंगाचा बनाव रचल्याची चर्चा आहे. त्याबाबत तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
निधी (नावात बदल) ही पालकांसोबत चारकोप परिसरात राहते. तिचे वडील कास्टिंग डायरेक्टर असून, आईनेदेखील पूर्वी काही जाहिरातींमध्ये काम केले आहे.