Join us

पश्चिम रेल्वेच्या मुख्य अधिक्षकाला सीबीआयने केली अटक, ५० हजारांच्या लाचखोरीचे प्रकरण 

By मनोज गडनीस | Updated: February 23, 2024 17:29 IST

संजय वाघेला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खाजगी कंपनीतर्फे पश्चिम रेल्वेला नियमितपणे काही सामान पुरवले जात होते.

मुंबई - तुझ्या कंपनीचे ४ कोटी ८० लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी प्रत्येक एक लाख रुपयांसाठी मला १०० रुपये या हिशोबाने ५० हजार रुपये मला दे, तुझे बिल मंजूर करतो. या पद्धतीने लाच मागणाऱ्या व ती स्वीकारणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील विभागीय व्यवस्थापक कार्यलयातील मुख्य अधिक्षकाला सीबीआयने अटक केली आहे.

संजय वाघेला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खाजगी कंपनीतर्फे पश्चिम रेल्वेला नियमितपणे काही सामान पुरवले जात होते. अलीकडेच कंपनीने पुरवलेल्या मालाची तीन बिले कंपनीने रेल्वेच्या लेखा विभागाला सादर केली. ही तिनही बिले एकूण ४ कोटी ८० लाख रुपये मूल्याची होती. या बिलांच्या मंजुरीकरिता संबंधित खाजगी कंपनीचा अधिकारी सातत्याने रेल्वेच्या लेखाविभागात अधिक्षकपदावर कार्यरत असलेल्या संजय वाघेला (आरोपी) याच्याशी पाठपुरावा करत होता. याच बिलांच्या मंजुरीसाठी त्याने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी