मुख्यमंत्री कार्यालय अजूनही चव्हाणांच्याच प्रेमात
By Admin | Updated: November 9, 2014 01:44 IST2014-11-09T01:44:25+5:302014-11-09T01:44:25+5:30
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आघाडी सरकार पायउतार झाले तरीही त्यांच्या कार्यालयातील प्रसिद्धी विभागाला त्याची कल्पना नसावी.

मुख्यमंत्री कार्यालय अजूनही चव्हाणांच्याच प्रेमात
मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आघाडी सरकार पायउतार झाले तरीही त्यांच्या कार्यालयातील प्रसिद्धी विभागाला त्याची कल्पना नसावी. विशेष म्हणजे भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कामाला सुरुवातदेखील केली. शुक्रवारी दिवसभर फडणवीस यांनी मुख्यमंत्री या नात्याने तीन-चार बैठका घेतल्या, शिष्ठमंडळांना भेटी दिल्या. मुंबईतील पायाभूत सोयी-सुविधांसंबंधी फडणवीस यांनी बैठकदेखील घेतली. त्याची प्रेसनोट काढताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रसिद्धी विभागाने ‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठक घेतली’ असे वृत्त प्रसिद्धीस दिले. झालेली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘रिवाईज्ड न्यूज’ असे म्हणत दुसरी बातमी पाठवली ज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव टाकून बातमी पाठवली. मात्र झालेल्या गंभीर चुकीबद्दल प्रसिद्धी कार्यालयाने ना खेद व्यक्त केला ना खंत. चुका होतात मात्र त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य न दाखवणो ही त्याहीपेक्षा जास्त गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया अधिका:यांमध्ये व्यक्त होत आहे. अजूनही पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात असणारा स्टाफच फडणवीस यांच्या कार्यालयात कार्यरत आहे हे विशेष! (प्रतिनिधी)