Join us  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 वाजता जनतेशी संवाद साधणार

By महेश गलांडे | Published: December 20, 2020 8:01 AM

राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. त्यातच, राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्री करतील.

ठळक मुद्देराज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. त्यातच, राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्री करतील.

मुंबई - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील कोरोनाची सद्यपरिस्थिती आणि अनलॉकची पुढील प्रक्रिया यासंदर्भात उद्धव ठाकरे जनतेला संबोधतील. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून होणारे आरोप आणि विधिमंडळाच्या अधिवेशन कार्यकाळाबद्दलही ते जनतेशी संवाद साधतील, असे दिसून येत आहे.  

राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. त्यातच, राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्री करतील. विरोधकांकडून सातत्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीला टार्गेट करण्यात येत आहे. मुंबईतील कारशेडचा मुद्दा असो किंवा लाईट बिलात नागरिकांना न मिळालेली सवलत असो, यासह कोरोना आणि इतर बाबींसंदर्भातही उद्धव ठाकरे नागरिकांशी चर्चा करतील. दरम्यान, काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करुन दिली आहे, त्यामुळे याबाबतही मुख्यमंत्री काय बोलतील, याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोरोना कालावधीते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सातत्याने फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.  

बाळासाहेब थोरात म्हणतात

महाविकास आघाडी स्थापन करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवण्यात आला. गरीब आणि मागासवर्गीय यावर अधिक लक्ष केंद्रित करणे हा उद्देश आम्ही ठेवला आहे.  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद असतो. त्यात काही गोष्टी लिखित स्वरूपात द्याव्यात, असे वाटल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पत्रव्यवहार केला. यात कोणाचीही नाराजी नसून, तो संवादाचा एक भाग आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील कोरोना परिस्थिती

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुख्यमंत्रीकोरोना वायरस बातम्या