मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून विदेश दौ-यावर, प्रमुख धुरिणांशीही चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 03:06 IST2017-09-26T03:06:32+5:302017-09-26T03:06:57+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारपासून दक्षिण कोरिया व सिंगापूरच्या दौ-यावर जात आहेत.

Chief Minister Devendra Fadnavis will also discuss the foreign tours on this occasion, with the main Dhuris | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून विदेश दौ-यावर, प्रमुख धुरिणांशीही चर्चा करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून विदेश दौ-यावर, प्रमुख धुरिणांशीही चर्चा करणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारपासून दक्षिण कोरिया व सिंगापूरच्या दौ-यावर जात आहेत.
पहिल्याच दिवशी स्योल येथे ह्योसंग केमिकल्स, सॅमसंग, ह्युंदेई हेवी इंजिनिअरिंग आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स आदी उद्योग समुहांच्या प्रतिनिधींसोबत शिष्टमंडळ चर्चा करेल. विविध महत्त्वाच्या प्रकल्पांनाही मुख्यमंत्री भेट देणार असून कोरियाच्या उद्योग-व्यापारी जगतातील प्रमुख धुरिणांशीही चर्चा करणार आहेत. राज्यातील विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उभारणीसह परकीय गुंतवणुकीबाबत बैठका होतील.
शिष्टमंडळात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आदींचा समावेश आहे.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis will also discuss the foreign tours on this occasion, with the main Dhuris