Join us
Daily Top 2Weekly Top 5

आस्थापना विभागाच्या प्रमुखपदी के. के. सारंगल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 06:07 IST

राज्य पोलीस मुख्यालयातील गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या आस्थापना विभागाच्या प्रमुख पदी अप्पर महासंचालक कुलवंत कुमार सारंगल रुजू झाले आहेत.

मुंबई  - राज्य पोलीस मुख्यालयातील गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या आस्थापना विभागाच्या प्रमुख पदी अप्पर महासंचालक कुलवंत कुमार सारंगल रुजू झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या पदाचा अतिरिक्त कारभार अप्पर महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्याकडे होता.सारंगल यांच्या नियुक्तीचे आदेश गृह विभागाच्या वतीने गुरुवारी जारी करण्यात आले. सारंगल हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून गेल्या अडीच वर्षांपासून ते जीएसटी विभागात मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते.मुदत पूर्ण होऊनही काही अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली नव्हती. त्यामुळे हे अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २५ आॅक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

टॅग्स :पोलिस