छोटा शकीलचे साथीदार गजाआड
By Admin | Updated: September 5, 2014 02:45 IST2014-09-05T02:45:31+5:302014-09-05T02:45:31+5:30
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी व गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाच्या अधिका:यांनी डी कंपनीच्या दोन गँगस्टर्सना माहीममधून अटक केली

छोटा शकीलचे साथीदार गजाआड
मुंबई : मुंबईत घडणारे संभाव्य गँगवॉर गुन्हे शाखेच्या अधिका:यांनी हाणून पाडले आहे. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी व गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाच्या अधिका:यांनी डी कंपनीच्या दोन गँगस्टर्सना माहीममधून अटक केली. या दोघांना शकीलने प्रतिस्पर्धी टोळ्यांमधल्या दोन प्रमुख गँगस्टरचा गेम करण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
महोम्मद माहिर कलबे सिद्दिकी आणि अख्तर जमाल खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांना काल दुपारी 2च्या सुमारास माहीम फाटक परिसरातून अटक करण्यात आली. या दोघांकडून .32 बोअरची रिव्हॉल्व्हर आणि चार जिवंत काडतुसे सापडली. यापैकी सिद्दिकी शकीलचा साथीदार असून, पूर्वीपासून डी कंपनीचा सक्रिय गँगस्टर आहे. त्याला बनावट पासपोर्टप्रकरणी 2क्1क्मध्ये लखनौ पोलिसांनी गजाआड केले होते. त्या प्रकरणात तो कारागृहात बंद होता. तो फेब्रुवारी महिन्यात सुटला आणि मुंबईत परतला. तर अख्तर शाहू नगर पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे.
शकीलने या दोघांना डॉन छोटा राजनच्या एकेकाळी अत्यंत जवळ असलेल्या आणि सध्या कारागृहात बंद असलेल्या गँगस्टरचा गेम करण्याची सुपारी दिली होती. या गँगस्टरला प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीसाठी वरचेवर सत्र न्यायालयात आणले जाते. तेथेच गोळ्या झाडून त्याचा खात्मा करण्याचे आदेश शकीलने या दोघांना दिले होते.
गेल्या काही दिवसांपासून दोघे शकीलच्या संपर्कात होते. शकील आणि या दोघांमध्ये सुपारीबाबत अनेकदा फोनवर चर्चा झाली. तसेच शकीलने या दोघांना व या दोघांनी शकीलला काही एसएमएसही धाडले. गुन्हे शाखेने या दोघांचे फोन तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. फोनच्या प्राथमिक चाचपणीतून ही बाब समोर आल्याचे समजते.
राजन टोळीपैकी रवी मल्लेश वोरा उर्फ डीके राव, सतीश तंगप्पन जोसेफ उर्फ सतीश काल्या आणि उमेद उर रेहमान या तीन गँगस्टर्सविरोधातील खटले सत्र न्यायालयात सुरू आहेत.
राजन, डी कंपनी या अंडरवल्र्डमधल्या प्रमुख प्रतिस्पर्धी टोळ्या आहेत. अंडरवल्र्डची मुंबईवरील पकड कमी झाल्यानंतरही या दोन टोळ्यांमधले गँगवॉर सुरूच आहे. मात्र चारेक वर्षामधल्या घडामोडी पाहता राजन टोळीने डी कंपनीवर अनेकदा हल्ले चढवले. त्यात डॉन दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल याच्या घराखाली गोळीबार, क्लब चालक छोटे मियाची हत्या, आसीफ दाढीवरला प्राणघातक हल्ला या घटनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
छोटा राजनच्या साथीदाराची सुपारी
छोटा शकीलच्या इशा:यावरून प्रतिस्पर्धी टोळ्यांमधल्या दोन प्रमुख गँगस्टर्सचा गेम करण्याच्या बेतात असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. यापैकी एक टार्गेट डॉन छोटा राजनचा विश्वासू साथीदार आणि सध्या कारागहात बंद असलेला गँगस्टर असल्याची माहिती मिळते.