छगन भुजबळ आणि समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
By Admin | Updated: April 27, 2016 15:02 IST2016-04-27T15:02:20+5:302016-04-27T15:02:20+5:30
छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना 11 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

छगन भुजबळ आणि समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 27 - महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही 11 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान न्यायालयाने छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ आणि अन्य 34 जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती.