‘मुंबई दर्शना’साठी आलेल्या मुलीची छेड; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:46 IST2018-04-27T01:46:58+5:302018-04-27T01:46:58+5:30
तिने आरडाओरड करताच पळ काढत तो एक्स्प्रेसमधील शौचालयात लपला.

‘मुंबई दर्शना’साठी आलेल्या मुलीची छेड; आरोपीला अटक
मुंबई : पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसने ‘मुंबई दर्शना’साठी आलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या अरविंद पुंड या आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली. मुंबई दर्शनासाठी सांगलीतून पती-पत्नी आपल्या १४ वर्षीय मुलीसह पुणे-मुंबई डेक्कन क्वीनच्या जनरल बोगीतून प्रवासाला निघाले. गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास माटुंगा ते दादर स्थानकांदरम्यान एक्स्प्रेस जात असताना आरोपीने मुलीची छेड काढली. तिने आरडाओरड करताच पळ काढत तो एक्स्प्रेसमधील शौचालयात लपला. सीएसएमटी स्थानकात एक्स्प्रेस येताच कुटुंबाने पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला. मात्र घटना माटुंगा ते दादर स्थानकांदरम्यान घडल्याने गुन्हा दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग झाला आहे.