चेन्नईच्या पावसाचा म्हाडाला फटका

By Admin | Updated: December 5, 2015 09:08 IST2015-12-05T09:08:25+5:302015-12-05T09:08:25+5:30

चेन्नईत झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम म्हाडाच्या कारभारावर झाला आहे. पावसामुळे चेन्नई येथील एनआयसी (नॅशनल इन्फर्मेशन सेंटर) चे संकेतस्थळ बंद झाल्याने निविदा सादर

Chennai's monsoon strikes MHADA | चेन्नईच्या पावसाचा म्हाडाला फटका

चेन्नईच्या पावसाचा म्हाडाला फटका

मुंबई : चेन्नईत झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम म्हाडाच्या कारभारावर झाला आहे. पावसामुळे चेन्नई येथील एनआयसी (नॅशनल इन्फर्मेशन सेंटर) चे संकेतस्थळ बंद झाल्याने निविदा सादर करणाऱ्यांना विहित मुदतीत निविदा भरता आल्या नाहीत. त्यामुळे म्हाडाने निविदा सादर करण्याची मुदत ५ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरचा पुनर्विकास आराखडा बनवण्यासाठी प्रकल्प नियोजन सल्लागाराची (पीएमसी) नेमणूक करण्यासाठी म्हाडाने ई-निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार ४ डिसेंबर रोजी या निविदा उघडण्यात येणार होत्या. पावसामुळे संकेतस्थळ बंद झाल्याने आता ८ डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Chennai's monsoon strikes MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.