चेंबूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: October 9, 2015 01:34 IST2015-10-09T01:34:43+5:302015-10-09T01:34:43+5:30
दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी चेंबूर येथे घडली. गोवंडी पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.

चेंबूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या
मुंबई: दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी चेंबूर येथे घडली. गोवंडी पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.
शिवम शिंदे (१५) असे या मुलाचे नाव असून तो चेंबूरच्या आरबीआय कॉलनीत आई-वडील आणि मोठ्या बहिणीसह राहत होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्याने घरातील पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील कामावरुन घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच, त्यांनी तत्काळ गोवंडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याचा मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. शिवमने मानसिक तणावातून ही आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. (प्रतिनिधी)